आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिरंगाईचा ठपका, मजूर निलंबित ,अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा मजुराच्या मुळावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- नांदूर मधमेश्वर जलद कालव्यात वैजापूर गंगापूरसाठी सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाणी वाटप नियोजन पूर्णपणे कोलमडले. अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा लपवण्यासाठी सोमवारी एका मजुराला तडकाफडकी निलंबित केले, तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी सहायकाच्या विभागीय चौकशीचे आदेश बजावले. कर्मचाऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. नांमकाच्या आतापर्यंतच्या काळात मजुराला निलंबित करण्याची ही पहिलीच कारवाई आहे. एस. जी. सूर्यवंशी असे निलंबित करण्यात आलेल्या मजुरांचे नाव आहे, तर कनिष्ठ अभियंता एस. आर. वाईकर, स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहायक बी. आर. वारकर या दोघांची विभागीय चौकशी करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण समूहाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने नांमकात ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले. वैजापूर गंगापूर परिसरात उघडीप दिल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली. मात्र, नांमकाला सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या पाण्यामुळे लाभधारकांत समाधान व्यक्त होत होते. दारणा धरण समूहातून ऑगस्ट रोजी नांदूर - मधमेश्वर जलद कालव्यात ओव्हरफ्लोचे पाणी सोडले. हे पाणी गंगापूर तालुक्यात पोहोचले नसल्याने शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आकांडतांडव केले होते. दोन दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता आर. एस. फुलंब्रीकर, सहायक उपअभियंता प्रशांत वनगुजरे यांना सोबत घेऊन कालव्याचा संयुक्तरीत्या पाहणी दौरा केला. त्यात काही भागात पाणीच पाणी झाल्याचे आढळून आल्याने शेतकऱ्यांनी फुलंब्रीकर यांची झाडाझडती घेतली होती. या प्रकारामुळे पाणी वाटपाचे नियोजन कोलमडल्याचे समोर आले. सोमवारी फुलंब्रीकर यांनी मजूर एस. जी. सूर्यवंशी यांना निलंबित केले, कनिष्ठ अभियंता एस. आर. वाईकर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक बी. आर. वारकर यांची विभागीय चौकशी चे आदेश काढले. नांदूर - मधमेश्वर कालवा सा.क्र ७३ मी.वरील सीआर कम एस्केपवरील रात्रपाळीचा मजूर एस. जी. सूर्यवंशी यांची कालव्यातील पाण्यावर देखरेख दक्षतेसाठी नेमणूक केली असताना कामात हलगर्जीपणा केला. रोटेशन काळात सीआर ७३ कि.मी. या भागात कामाचे नियोजन २१ ते २३ ऑगस्टदरम्यान आखले. ऑगस्ट रोजी रात्री एस्केपचे गेट उघडल्याने तालुक्यातील टेलच्या भागातील असंतोष निर्माण झाला. बेलगाव ,सुराळा पाझर तलाव भरण्याचे नियोजन नसताना तलाव भरून देण्यात आला.

नियोजनाचा बोजवारा
कालव्यातपाणी सोडल्यानंतर त्याचे नियोजन पाहणारे नांमका प्रशासन नेहमीच उदासीनता दाखवत असल्याने संतापाचे वातावरण आहे. यात अधिकाऱ्यांनी आपली चूक लपवण्यासाठी एका चतुर्थश्रेणीच्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचा फार्स केल्याने कर्मचाऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे.