आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेतील खांदेपालटीचे घोडे अडकले, वर्चस्वासाठी खा. खैरे प्रयत्नशील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर लगेच शिवसेनेत पदाधिकाऱ्यांमध्ये बदल होणार होते. तसे वरिष्ठांनीही स्पष्ट केले होते. मात्र, सव्वा वर्ष संपले तरी अजूनही पदाधिकारी बदलले गेले नाहीत किंवा खांदेपालट झाली नाही. सेनेमध्येही भाजपप्रमाणेच ‘चर्चे पे चर्चा’ सुरू असल्याने खांदेपालटाचे घोडे मध्येच अडकले आहे.

पक्ष पदाधिकारी असलेले काहीजण निवडून आल्याने शिवसेनेत फेरबदल करण्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी स्थानिक नेत्यांनी लगोलग बैठकाही घेतल्या. परंतु कोणाला दूर करायचे आणि नव्याने कोणाला संधी द्यायची यावर एकमत झाल्याने गतवर्षी एप्रिलमध्ये फेरबदल पुढे ढकलण्यात आले. तेव्हापासून सातत्याने हे बदल पुढे ढकलले जात आहे. जूनला शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेचा वर्धापन दिन सोहळा झाला. त्या सोहळ्यात किंवा त्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले होते. त्याची तयारीही पक्षनेत्यांनी सुरू केली होती, परंतु ऐनवेळी काहीही झाले नाही. गेल्या वर्षांपासून अंबादास दानवे हेच जिल्हाप्रमुख आहेत.
ग्रामीणचे जिल्हाप्रमुख वेळोवेळी बदलले. त्यानंतर शहराध्यक्षही बदलण्यात आले. परंतु दानवे कायम आहेत. त्यामुळे दानवे यांना पदोन्नती देऊन त्यांच्या जागेवर दुसऱ्याची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू होत्या. परंतु दुसरा सक्षम चेहरा समोर येऊ शकल्यामुळे दानवे यांना आहे त्या जागी ठेवून अन्य पदाधिकाऱ्यांचे बदल करावेत असे ठरले होते. त्यानुसार ग्रामीणचे जिल्हाप्रमुख तसेच तीन शहरप्रमुख या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अन्य बदल केले जातील, असे अपेक्षित होते. मात्र कोणताही निर्णय होत नसल्याने संघटनेच्या पदावर संधी मिळेल या आशेवर असलेल्यांमध्ये नाराजी आहे. जिल्ह्याच्या संघटनेवर आपलेच वर्चस्व असावे, यासाठी खासदार खैरे प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे माजी आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, दानवे यांनाही आपले कार्यकर्ते पदावर हवे आहेत. त्यात एकवाक्यता होत नसल्यामुळेच फेरबदल लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येते.

पुढे वाचा... जंजाळांना मुदतवाढ