आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Bodybuilding Championships Silver Medal To Ganesh Dusariya

कर्ज काढून बनला राष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर आपल्या पीळदार शरीरयष्टीने अनेक राज्य स्पर्धा गाजवणारा औरंगाबादचा युवा शरीरसौष्ठपपटू गणेश दुसारियाने नवी दिल्ली येथे झालेल्या ५६ व्या वरिष्ठ मि. इंडिया शरीरसौष्ठव स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. विशेष म्हणजे प्रचंड खर्चिक असलेल्या या खेळासाठी गणेशने आहारासाठी कर्ज काढून हे यश मिळवले आहे.
गणेशची आर्थिक परिस्थिती सामान्य आहे. वडील खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे शेती करतात. आई गृहिणी आणि भाऊ बेरोजगार असतानाही कुटुंबीयांच्या पाठिंब्याच्या बळावर गणेशने शरीरसौष्ठव स्पर्धेत यश मिळवले. २६ वर्षीय गणेशने नुकताच नांदेड येथे झालेल्या स्पर्धेत मराठवाडा श्री पुरस्कार पटकावला. तो देवगाव रंगारी येथील आसाराम भांडवलदार महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. राज्य संघटनेच्या मान्यतेने नुकत्याच वडार (कोल्हापूर) येथे झालेल्या वडार श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत गणेशने ७५ किलाे वजन गटात दुसरा क्रमांक पटकावला.

आशियाईस्पर्धेची तयारी
पुणेयेथे येत्या जून महिन्यात होणाऱ्या दक्षिण आशियाई स्पर्धेच्या तयारीसाठी तो कठोर मेहनत घेत आहे. या स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकण्याची आशा आहे. त्यासाठी दररोज १.५ किलो चिकन-मटण, ३० अंडी, ७०० ग्रॅम मासे, दूध आणि विविध फळे असा आहार घेत असून बजाजनगर येथील मसल फॅक्टरी जिममध्ये दररोज ते तास व्यायाम करत आहे.

दरमहा ४० हजारांचा खर्च; ३.५ लाखांचे कर्ज
गणेशला महिन्याला ४० हजार रुपये खर्च लागतो. हा महागडा खेळ जिवंत ठेवण्यासाठी आहार व्यायामासाठी वेळोवेळी पैसा कमी पडत असल्याने आतापर्यंत एकूण ३.५ लाखांचे कर्ज काढले. त्याला आतापर्यंत अनेकांनी थोडेफार अर्थसाहाय्य केले, मात्र ती मदत तोकडी असल्याने त्याच्या खेळावर परिणाम होत आहे.