आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीची विमानवारी आता 6200 रुपयांत; सकाळी सव्वा दहा वाजता गाठता येणार दिल्ली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद ते दिल्ली जेट एअरवेजच्या विमान प्रवासासाठी ८५०० ते १०००० रुपयांएवेजी आता केवळ ६२०० रुपयेच मोजावे लागणार आहेत. सोमवारपासून या नवीन दरानुसार तिकीट आकारणी सुरू झाली आहे. परतीच्या प्रवासासाठीसुद्धा याच दरात तिकीट मिळावे यासाठी कंपनीने पाठपुरावा सुरू केला आहे. 

औरंगाबादहून दिल्ली जेटचे विमान सकाळी, तर एअर इंडियाचे विमान संध्याकाळी आहे. जेटचे विमान औरंगाबाद-मुंबई-दिल्लीमार्गाने जाते. आतापर्यंत या मार्गासाठी कंपनी औरंगाबाद ते मुंबई एक प्रवास आणि मुंबई ते दिल्ली दुसरा प्रवास अशा पद्धतीने तिकीट आकारत होते. यामुळे प्रवाशांना ८५०० ते १०००० रुपये तिकीट लागत हाेते. जेट एअरवेजच्या औरंगाबाद कार्यालयाचे एरिया मॅनेजर अहमद जलील यांनी कंपनीकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. 

६२०० रुपये फिक्स दर 
कंपनीने औरंगाबाद ते दिल्लीचा प्रवास थ्रू फेअर सेल प्रकारात आणला. या प्रकारात औरंगाबाद ते दिल्ली हा सलग प्रवास धरण्यात आला अाहे. त्यामुळे विमान बदलता एकाच विमानाने प्रवाशांना सलग दिल्लीचा प्रवास करता येऊ शकेल. ही विशिष्ट काळासाठीची सवलत नसून कायमस्वरूपी आहे, अशी माहिती जलील यांनी दिली. 

स्वस्तात १०.१५ वाजता दिल्ली 
औरंगाबादहून पहाटे ६.४५ वाजता विमान उड्डाण करेल. ७.३० वाजता ते मुंबईला पोहोचेल. तेथून ८.३० वाजता उड्डाण करून १०.१५ वाजता दिल्लीला पोहोचेल. 

सर्वांना परवडणारा 
सकाळीदिल्लीलापोहोचणारे विमान महाराष्ट्र आणि उत्तर भारताला हवाई मार्गाने जोडणारा एकमेव दुवा आहे. सकाळी लवकर पोहोचल्याने दिल्लीतील कामे करणे सहज शक्य आहे. दिल्लीहून लंडन, दुबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे उपयोगी ठरते. 
- सईद अहमद जलील, एरिया मॅनेजर, जेट एअरवेज, आैरंगाबाद 
बातम्या आणखी आहेत...