आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Institute Primer Observation : Bhagvat Allowed Her Murderer In Home

दिल्लीच्या संस्थेचा प्राथमिक निष्कर्ष : भागवत यांनीच दिला मारेकर्‍याला घरात प्रवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - श्रुती भागवत यांनीच मारेकर्‍याला घरात प्रवेश दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दिली. घटनास्थळी सापडलेले अवशेष पुढील तपासासाठी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सकडे पाठवण्यात आल्याचेही ते म्हणाले.

गुरुवारी (18 एप्रिल) भागवत यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, मारेकर्‍याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. दिल्लीतील इन्स्टिट्यूटच्या अहवालाकडे लक्ष लागून असल्याचे संजयकुमार यांनी सांगितले. हत्येनंतर पोलिसांनी फिंगरप्रिंट, तुटलेल्या खुच्र्यांचे तुकडे, रक्ताचे नमुने आणि घटनास्थळावरील अवशेष हस्तगत केले होते. तसेच जवळपास अडीच हजार जणांची चौकशी केली. मात्र, काहीही हाती लागले नाही. दरम्यान, 23 मार्च 2013 रोजी ‘जेंडर सेन्सिटायझेशन अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ क्राइम अगेन्स्ट वुमेन’ या कार्यशाळेसाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसचे (आरुषी तलवार हत्याकांडाचा तपास करणारे) प्रा. डॉ. टी.डी. डोग्रा, अनुपमा रैना आणि संजीव ललवाणी शहरात आले होते. त्यांनी दुसर्‍या दिवशी 24 मार्चला भागवत यांच्या घराची पाहणी केली होती.

या पाहणीदरम्यान भागवत यांनीच मारेकर्‍याला घरात प्रवेश दिला होता, असा संशय या तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. तपासाच्या दृष्टिकोनातून दोन महत्त्वाच्या बाबी या तज्ज्ञांनी मांडल्या आहेत. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे घटनास्थळावर सापडलेले अवशेष, फिंगरप्रिंट, रक्ताचे नमुने इन्स्टिट्यूटला पाठवण्यात आले आहेत.