आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे संपल्याने सापडले दिल्लीचे प्रेमी जोडपे, रेल्वे पोलिसांनी मुलीला केले कुटुंबीयांच्या हवाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-  जुन्या दिल्लीतील जहांगीरपुरी येथून पळून आलेले जोडपे त्यांच्याकडील पैसे संपल्याने औरंगाबाद रेल्वे पोलिसांना सापडलेे. 
 
प्राची (१६, नाव बदलले आहे) आणि आकाश कुमार (१९) 4 जुलै रोजी घरातून पळाले. तो तिच्या घरात भाडेकर म्हणून राहत असताना त्यांचे प्रेम जुळले होते. घरच्यांच्या विरोधामुळे त्यांनी 4 जुलै रोजी हैदराबाद गाठले. 

१७ जुलै राेजी रात्री ते औरंगाबादेत पोहोचले. तोपर्यंत त्यांच्याकडील पैसेही संपल्याने त्यांना पुढे प्रवास करणे शक्यच नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव पाहून रेल्वे पोलिसांनी खाद्यपदार्थ देत आपुलकीने त्यांची चौकशी केली. तेव्हा हा प्रकार समोर आला. मग पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधून तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. आकाशची चौकशी सुरू आहे. 
 
या प्रकरणात रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी मदत केली. सहायक पोलिस निरीक्षक सागर गोडे, भगवान कांबळे, उपनिरीक्षक आनंद बनसोडे, मिर्झा अन्वर बेग, अंमलदार धनराज गडलिंगे, माधव दासरे, शांताराम ढवळे, यशवंत गायकवाड, महिला शिपाई छाया शिंदे यांनी महत्वाची भूमिका बजावली  
बातम्या आणखी आहेत...