आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवार्ता: उधार दारू मागण्यावरून वाद; अॅसिड हल्ल्यात दोघे जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅसिड हल्ल्यानंतर पोलिसांनी वाळूजच्या देशी दारू दुकानाची पाहणी केली. छाय : धनंजय दारुंटे - Divya Marathi
अॅसिड हल्ल्यानंतर पोलिसांनी वाळूजच्या देशी दारू दुकानाची पाहणी केली. छाय : धनंजय दारुंटे
वाळूज - उधार दारू मागण्यावरून झालेल्या वादात अॅसिड हल्ला केल्याची घटना बुधवारी बजाजनगरातील गोशाळेजवळील देशी दारू दुकानात घडली. यात दुकानात काम करणारे दोघे जखमी झाले. घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत हल्लेखोरही जखमी झाले असून चौघांवरही घाटीत उपचार केले जात आहेत. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हमाली करणारे अशोक गव्हारे आणि प्रकाश जरारे बुधवारी सायंकाळी बजाजनगर येथील देशी दारूच्या दुकानात आले. कर्मचारी सतीश घोरपडे (२५) शरद साळवे यांना दारू उधार मागितली. त्यांनी दारू देण्यास नकार देताच या दोघांनी वाद घातला. दुकानाबाहेर काढण्याचा प्रयत्न करूनही दोघे जात नसल्याने सतीशने काउंटरची कडी लावून त्यांना आत येण्यास मज्जाव केला. तेव्हा अशोकने कॅनमधील अॅसिड सतीश शरदच्या दिशेने फेकले. अंगावर अॅसिड पडताच झालेल्या तीव्र वेदनांमुळे सतीश शरदने आरडाओरड केली. दुकानात धावलेल्या नागरिकांनी अशोक प्रकाशला मारहाण केली. त्यात अशोकच्या डोक्याला जखम झाली, तर प्रकाशला मुकामार लागला.

दरम्यान, दुकानात काम करणाऱ्या नितीन घोरपडेने पोलिसांना फोनवरून माहिती दिली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चारही जखमींना पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणी सतीशच्या फिर्यादीवरून अशोक प्रकाशविरोधात, तर मारहाण केल्याप्रकरणी अशोकच्या फिर्यादीवरून सतीश, शरद इतरांविरोधात वाळूज एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढे वाचा.. विवाहितेची विष घेऊन आत्महत्या , सतरावर्षीय तरुणीचे अपहरण
बातम्या आणखी आहेत...