आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"हॉलिडे' रेल्वेगाड्या सुरू करा, स्वातंत्र्यसेनानी तारा लड्डा यांचे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पर्यटकांसह विद्यार्थी, नोकरदार, कामगार, कष्टकऱ्यांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने उन्हाळी सुटीत दोन महिने हॉलिडे विशेष रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी मराठवाडा रेल्वे विकास समिती स्वातंत्र्यसेनानी तारा लड्डा यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे.
शहरात बीबी का मकबरा, बावन्न दरवाजे, पाणचक्की, नहर अंबरी, औद्योगिक वसाहत, शैक्षणिक हब, जागतिक दर्जाची वेरूळ अजिंठा येथील लेणी, घृष्णेश्वर मंदिर या तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी दररोज ३० ते ४० हजार देशीविदेशी पर्यटक येतात. याचबरोबर हजारो पर्यटक जम्मू काश्मीर, तिरुपती, जयपूर, राजस्थान, काशी, अमृतसर, दिल्ली, आग्रा, मुंबई, आंध्र प्रदेश, गोवा आदी ठिकाणी जातात. उन्हाळ्याच्या सुटीत येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखोत असते, पण प्रवासासाठी सुरक्षित आणि संरक्षित व्यवस्थेचा अभाव असल्याने अनेक जण जाण्याचे टाळतात किंवा खासगी वाहन वापरतात. यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडतो. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हॉलिडे विशेष रेल्वे सुरू याचा विचार करून रेल्वे प्रशासनाने हॉलिडे विशेष रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.यासंदभार्त नांदेड रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष झाल्याने केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे.
या रेल्वेगाड्या सुरू करा

वैष्णोदेवीला जाणाऱ्या भक्तांसाठी नांदेड, औरंगाबाद, नवी दिल्लीमार्गे जम्मूतावी.
औरंगाबाद-बंगळुरू, औरंगाबाद-गोवा, औरंगाबाद- वाराणसी, औरंगाबाद-नागपूर सर्वोदय एक्स्प्रेस
नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड, सुरत, वडोदा, अहमदाबाद, आबू रोड, पालीथाना, मारवाडा, जोधपूर, मेडता नागोरे, बिकानेर आठवड्यातून दोन वेळा
अतिरिक्त डबे जोडण्याची विनंती

3 मे रोजी मुंबईला ऑल इंडिया मेडिकल टेस्ट होणार असल्याने ते मे रोजी नांदेड- औरंगाबाद ते मुंबई जाणाऱ्या तपोवन, नंदीग्राम, देवगिरी एक्स्प्रेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त डब्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी समितीचे ओमप्रकाश वर्मा आणि स्वातंत्र्यसेनानी तारा लड्डा यांनी केली आहे.