आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात आता तीन नवीन आरोग्य केंद्रांचा प्रस्ताव, साताऱ्यात केंद्र स्थापण्याचा विचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महानगरपालिकेचीहद्द दिवसेंदिवस वाढत चालली असून लोकसंख्येतही भर पडत आहे. परिणामी, आरोग्य सुविधा पुरवण्यात अनंत अडचणी येत आहेत. ही बाब लक्षात घेत तीन नवीन आरोग्य केंद्रांसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती मनपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

दरवर्षी पावसाळ्यात शहरात मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. सोयी-सुविधा पुरवताना मनपाची यंत्रणा कमी पडते. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढून नागरिकांना खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागते. ही अडचण कमी व्हावी म्हणून शहरातील एन-७ येथील पाण्याची टाकी, गांधीनगरातील मनपा शाळा आणि साताऱ्यात आरोग्य केंद्र सुरू करण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. त्याला लवकरच परवानगी मिळेल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला. ३० खाटांचे हे केंद्र असणार असल्याने नागरिकांना उत्तम सेवा मिळण्याची शक्यता आहे. यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातून प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. यातून दोन कोटी ५० लाख रुपयांच्या निधी उपलब्ध झाला असून लवकरच त्याचे टेंडर काढण्यात येईल. आरोग्य केंद्र सुरू झाल्यास अडचण दूर होईल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातून आरोग्य सेवा देण्यासाठी शहरातील सिल्क मिल, नारेगाव आणि चिकलठाणा आरोग्य केंद्रात ३० खाटा वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी ५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी २० लाख रुपये प्राप्त झाले आहे.

दोन मोबाइल व्हॅन
शहरातीलज्या भागात आरोग्य केंद्राची व्यवस्था नाही तसेच काही भागात तातडीची गरज म्हणून आरोग्य सेवा पुरवण्यासाठी मोबाइल व्हॅनचा उपयोग होणार आहे. यासाठी दोन मोबाइल व्हॅनचा प्रस्तावही शासनाकडे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून पाठवण्यात आला आहे. लवकरच या व्हॅनही मिळणार आहेत.