आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याऐवजी वाळूज ग्रामपंचायतीने त्याची रेकॉर्डला नोंद घेतली. त्या जागेचा नमुना नं. चा उताराही अतिक्रमणधारकास दिला. त्यामुळे सरपंच ग्रामविकास अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी अशोक पाटील काकडे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात धाव घेऊन केली.
येथील झेंडा मैदान चौकाच्या पूर्वेकडील काकडे वसाहतीत काकडे हे मालकी हक्काच्या मिळकत क्र. ५७ मधील घरात सहकुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे पीआर कार्डदेखील आहे. घरासमोरील पूर्व बाजूस ३० फूट रुंदीचा उत्तर-दक्षिण असा सार्वजनिक रस्ता आहे. यावर कैलास भाग्यवंत यांनी दोन पत्र्यांच्या खोल्या बांधून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना या रस्त्याचा वापर करण्यास अडचणी येत अाहेत. सार्वजनिक रस्त्यावरील रहदारीला अडथळा करणारे अतिक्रमण हटवण्यासाठी या वेळी ग्रामपंचायतीकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, ग्रामपंचायतीने कारवाई करण्याऐवजी या अतिक्रमणाची रेकॉर्डला नोंद घेऊन त्यांना नमुना नं. चा उतारा दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे, अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या सरपंच रंजना भोंड तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एन. के. वाघमारे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अतिक्रमणा संबंधित तक्रारीच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, गंगापूर पंचायत समिती आदींनाही दिल्याचे नमूद आहे.
प्रकरण पूर्वीचे
- हा जागेचा वाद मी बदलून येण्यापूर्वीचा आहे. शिवाय, प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर अधिक बोलणे सध्यातरी योग्य होणार नाही.
एस. सी. लव्हाळे, ग्रामविकास अधिकारी, वाळूज.
प्रकरण न्यायप्रविष्ठ
- या जागेसंदर्भातील वाद गंगापूर दिवाणी न्यायालयात सुरू आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने जास्त बोलणे उचित नाही. लवकरच न्यायनिवाडा होईल.
कैलास भाग्यवंत, काकडे वसाहत, वाळूज.
बातम्या आणखी आहेत...