आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीच्या पाण्याची मागणी वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुळाधरणातून ७०३० क्युसेकने पाणी जायकवाडीत सोडण्यात आल्यामुळे धरणात १४ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता निळवंडे धरण भरले असून त्यामधून ८४४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, जायकवाडीतून पाणी मिळावे यासाठी जालनाच्या तीनही बंधाऱ्यात पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. अंबड गेवराईसाठी दलघमी पाणी सोडण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती कडाच्या सूत्रांनी दिली.
जालना जिल्ह्यातील मंगरूळ, राजाटाकळी आणि लोणीसावंगी या तिन्ही बंधाऱ्यांत पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जालनाजिल्‍हाधिकाऱ्यांनी केली आहे. त्याबाबतचे पत्रही पैठणच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे. मंगरूळ बंधाऱ्याची साठवण क्षमता २५ दलघमी, राजाटाकळी २५ आणि लोणीसावंगी ३० दलघमी इतकी आहे. याबाबत पिण्यासाठी किती पाणी आवश्यक आहे, याची माहिती जालना जिल्हा परिषदेकडून घेण्यात येत आहे. या तिन्ही बंधाऱ्यांवर १०० ते १२५ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. अंबड आणि गेवराईसाठी शहागड बंधाऱ्यात पाच दलघमी पाणी सोडण्यात यावे, असा प्रस्ताव कडा प्रशासनाकडे आला आहे.
माजलगावला पाणी देणार
माजलगावधरणात सध्या शून्य टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जायकवाडीत पाणी आल्यानंतर माजलगावला पाणी सोडण्यात येणार आहे. साधारणत: ३५ दलघमी पाण्याचे आरक्षण असून जायकवाडीत किती पाणी येणार हे पाहून माजलगावला पाणी सोडण्यासंदर्भात कडाकडून नियोजन करण्यात येत आहे.