आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Democratic Able To Make It To The Absolute Unopposed: Bhanudas Palav

निरपेक्ष मतदानातून लोकशाही सक्षम बनवूया : भानुदास पालवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक-राष्ट्रीय मतदार दिवसाच्या मतदार प्रतिभेला बांधील मतदानातून लोकशाही सक्षम बनवूया, असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी केले. मतदानासंदर्भात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, नेहरू युवा केंद्र आणि ‘दिव्य मराठी’ यांनी राबविलेले अभियान स्तुत्य असल्याचेही पालवे यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आयोजित ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन प्रभारी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी भानुदास पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी रमेश मिसाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीतांजली बाविस्कर, उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण, तहसीलदार गणेश राठोड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमांतर्गत शासकीय कन्या शाळेच्या विद्यार्थिनींनी ‘मतदार राजा जागा हो’ या विषयावर पथनाट्य सादर केले. निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना व उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले गेले. गीतांजली बाविस्कर यांनी प्रास्ताविक, तर मीनाक्षी राठोड यांनी सूत्रसंचालन केले. रमेश मिसाळ यांनी आभार मानले. याप्रसंगी विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.