आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतरही फुलंब्रीत चलन तुटवडा कायम, सर्वसामान्य नागरिक पन्नास दिवसांनंतरही रांगेतच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री- नोटाबंदीच्या निर्णयाला ५०  दिवस उलटूनही चलनपुरवठा सुरळीत न झाल्याने या परिस्थितीचा गैरफायदा उठवत नवा काळा पैसा मात्र तयार होतो आहे. मात्र, फुलंब्री तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक पन्नास दिवसांनंतरही बँका आणि एटीएमच्या रांगेतच अजूनही  उभे आहेत. त्यामुळे सरकार  हा नोटाबंदीच्या निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या जिवावर चांगलाच बेतत आहे.

फुलंब्री तालुक्यात ५ राष्ट्रीयीकृत बँका, २ ग्रामीण बँका, ३ खासगी बँका, १३ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून तालुक्यातील नागरिक व्यवहार करत असतात. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने चलनातील जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा पूर्णपणे बंद केल्याने ग्रामीण भागाचे अर्थचक्र पूर्णपणे कोलमडले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत नागरिकांना आपले स्वतःचे पैसे मिळवण्यासाठी खातेदारांना तासन््तास रांगेत उभे राहावे लागत असले तरी रांगेत उभे राहूनसुद्धा पैसे मिळतील का, याची गॅरंटी नसल्याने सर्वसामान्य नागरिकांवर त्रस्त होण्याची वेळ आली आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने हातातोंडाशी आलेले खरिपाचे उत्पन्न मका व कापूस यावर व्यापाऱ्याची नजर पडल्याने नोटाबंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची अडवणूक करून या शेतकरी राज्याला अक्षरशः उघड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. फुलंब्री तालुक्यात शासकीय कर्मचारी यांचा पगार एक कोटी रुपयांच्या आसपास आहे व या शासकीय कर्मचाऱ्यांचे खाते स्टेट बँक ऑफ हैदराबाद व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहे. मात्र, या बँकेत दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत नसल्याने नोकरदारवर्गावर संक्रांतीच्या अगोदरच आर्थिक संकट कोसळले आहे. कोणत्याही खातेदाराला आठवड्यात फक्त चोवीस हजार रुपयेच काढता येतात. सध्या रब्बी पिकाची खुरपणी, कोळपणी, निंदणी सुरू आहे. त्यामुळे शेतात राबणाऱ्या कामगाराला बँकेत पैसे असूनसुद्धा पैसे देता येत नसल्याने शेतकरी व शेतमजूर जाम संकटात सापडले आहेत. 

तालुक्यात एकूण १३ एटीएम सेंटर  
फुलंब्री तालुक्यात एकूण १३ एटीएम सेंटर आहेत. त्यापैकी एकट्या फुलंब्री शहरात ९, तर वडोद बाजार १, गणोरी २, आळंद १ एटीएम सेंटर आहे. मात्र, ८ नोव्हेंबरपासून फक्त दोन - तीन एटीएम सेंटरमध्येच नागरिकांना अधूनमधून रक्कम मिळत आहे तर उर्वरित एटीएम सेंटरमध्ये नोटाबंदीच्या निर्णयापासून ठणठण गोपाळच आहे.
बातम्या आणखी आहेत...