आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रशालेत डेंग्यू जनजागृती आणि मार्गदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - न्यू बालाजीनगर येथील कर्मवीर श्री शंकरसिंग नाईक हायस्कूलमध्ये डेंग्यू जनजागरण मार्गदर्शन आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुलभा वट्टमवार या होत्या. आरोग्य शिबिराचे मार्गदर्शक डॉ. माळी, डॉ. फारूक पटेल, डॉ. व्यंकटेश उबाळे, डॉ. प्रवीण पाटील, डॉ. संजय लपकरे, डॉ. शेषराव नाडे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. माळी यांनी विद्यार्थ्‍याना डेंग्यू आजाराविषयी माहिती देऊन या आजारावर प्रतिबंध करण्यासाठी उपाय म्हणून मच्छरदाणीचा वापर करणे, पाण्याचा साठा कमी करणे तसेच पाणी झाकून ठेवणे आदी उपायांविषयी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका वट्टमवार यांनी आजाराची लक्षणे तसेच आजार होऊ नयेत यासाठी कोणती काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डी. के. बंगाळे यांनी केले.