आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा-देवळाई परिसरात कावीळ, डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ठिकठिकाणी साचलेले पाण्याचे डबके व उघडे नाले यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सातारा देवळाई भागामध्ये डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. नुकतेच सातारा, देवळाई भागातून खासगी रुग्णालयांमध्ये ताप,सर्दी, खोकला व काविळीचे रुग्ण भरती होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिसराचा पालिकेमध्ये समावेश झाल्यापासून स्वच्छता मोहीम, कचरा साफसफाई सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु अर्ध्याअधिक परिसरांमध्ये अस्वच्छता व नाल्यांमुळेच आजार वाढले अाहेत, अशा तक्रारी
नागरिकांनी केल्या आहेत.
सातारा गावात दोन विहिरी व मोठा नाला आहे. पालिकेमार्फत सुरू पाण्याचे टँकर याच विहिरीमध्ये रिकामे केले जाते. परंतु विहिरीची अनेक दिवसांपासून स्वच्छता करण्यात आलेली नाही. एका विहिरीच्या बाजूने वाहत असलेल्या नाल्याचे पाणी विहिरीच्या पाण्यात िझरपत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. पालिकेच्या वतीने दोन्ही परिसरासाठी सफाई कर्मचारी व कचरा वाहून नेण्यासाठी दोन ट्रॅक्टर देण्यात आले आहेत. परंतु अनेक ठिकाणी नाले तुंबले असून त्याची स्वच्छता करण्यात आलेली नाही. रोहिदास नगर व एकता कॉलनी परिरसरामध्ये सातारा गावाला जोडणाऱ्या पुलाखालील नाला अनेक दिवसांपासून तुंबला आहे. याच नाल्यामध्ये ड्रेनेजचे पाणी सोडण्यात येते. त्यामुळे जवळपास राहणाऱ्या परिसरामध्ये डासांचे प्रमाण वाढले असून साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे.
या परिसरामध्ये जास्त धोका : सातारा गाव, रोहिदास कॉलनी, बजाज हॉस्पिटल मागील परिसर, देवळाई रस्ता आदी भागांमध्ये डबके साचलेले आहेत. तसेच याच भागांमध्ये नाल्यांची
स्वच्छताही झालेली नाही.

जंतुनाशकाचा वापर नाही
गावामधील विहिरीचे पाणी अनेक दिवसांपासून तपासण्यात अालेले नाही. मात्र त्याच विहिरीमध्ये टँकरने पाणी टाकून नागरिकांना पुरवले जाते. या विहिरीवर जवळपास चारशे ते पाचशे घरांचे पिण्याचे पाणीसुद्धा अवलंबून आहे. ग्रामपंचायतीच्या काळामध्ये विहीर तसेच घरोघरी जाऊन पिण्याच्या पाण्यामध्ये जंतुनाशक औषधी टाकण्यात येत होती. परंतु आता पाणी शुद्धीकरणाच्या कोणत्याही हालचाली दिसत नसल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्या आशा शिराणे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...