आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी कारवाईचा फार्स, आता जनतेची फसवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेंग्यूमुळे सिडको-हडको त्रस्त असताना मनपा आरोग्य प्रशासन आणि पदाधिकारी जनतेची फसवणूक करत आहेत. फवारणी ठेकेदारांची मुदत संपलेली असताना त्यांचे ठेके रद्द केल्याचा बनाव सभापती विजय वाघचौरे यांनी केला. त्यानंतर ठेकेदार नसल्याचे कारण देत प्रशासन त्याच वादग्रस्त ठेकेदारांना कामे देऊन जनतेची फसवणूक करत आहे. दुसरीकडे, वर्षानुवर्षे विनाटेंडर याच ठेकेदारांना कामे दिली जात असल्याचे ‘डीबी स्टार’च्या तपासात उघड झाले आहे.

सिडको-हडकोत फोफावलेला साथरोगाचा प्रसार, सर्वत्र डेंग्यूग्रस्त परिस्थिती, सातपेक्षा अधिक रुग्ण दगावल्याच्या घटना, नागरिकांचा टाहो, औषध फवारणी होत नसल्याच्या असंख्य तक्रारी आणि पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष. यावर ‘डीबी स्टार’ने सातत्याने कोरडे ओढले. यानंतर थेट ८ आॅगस्ट रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये दिखाव्याची कारवाई केली.तपासाअंती हा फार्स असल्याचे उघड झाले. प्रकरण इथेच थांबलेले नाही. आता तर ठेकेदार नसल्याचे कारण देत त्याच ठेकेदारांकडून कामे करून घेतली जात आहेत.

चार वर्षांत निविदाच नाहीत
२८ जुलै २०११ रोजी मनपा आरोग्य विभागाने नागरी हिवताप योजनेअंतर्गत औषध फवारणी करणाऱ्या पेस्ट कंट्रोल कंपन्यांच्या ई टेंडर प्रक्रियेनुसार निविदा मागवल्या. निविदा खुल्या झाल्यानंतर सिडको-हडकोचे सहा झोन आखण्यात आले. त्यात झोन क्रमांक १ वॉर्ड ईसाठी रामदास ठोंबरे (भारत पेस्ट कंट्रोल) झोन क्रमांक २, गणेश नागरे, (गणेश पेस्ट कंट्रोल) झोन क्रमांक ३ वॉर्ड ब शिवाजी थोरे (आरडी पेस्ट कंट्रोल) झोन क्रमांक ४ वॉर्ड ब संतोष राठी (सचिन पेस्ट कंट्रोल) सुरुवातीला या चार ठेकेदारांना ८७ हजार ४०७ रुपये मानधन दिले जात होते. मात्र, ३१ जानेवारी २०१३ च्या नवीन दरवाढीनुसार त्यांना दरमहा २ लाख १० हजार रुपये दिले जातात, तर झोन क्रमांक ५ वॉर्ड ब फकीरंचद पखे (निलेश पेस्ट कंन्ट्रोल,)झोन क्रमांक 6 वार्ड ब कारभारी घुगे (पूर्णेश्वर पेस्ट कंन्ट्रोल) या ठेकेदारांना कामे देण्यात आली.

ठेकेदारांना कामे देण्यात आली.या ठेकदारांना सुरवातीला 57 हजार रूपये मिळत असतांना 31 जानेवारी 2013 च्या दरवाढीनुसार दरमहा 84 हजार 407 रुपये देण्यात येतात.यांनतर मात्र निविदा काढण्यात आल्या नाहीत मनपा प्रशासनाने 2014 मध्ये निविदा मागवल्या मात्र अद्याप त्याही खुल्या केल्या नाहीत.

तोंडी आदेश
औषध फवारणी करणाऱ्या ठेकेदारांना कामे दिल्यानंतर 23 सप्टेंबर 2011 ते 17 एप्रिल 2012 या सात महिन्याची आॅर्डर दिली यांनतर 31 जानेवारी 2013 ते 20 मे 2013 या सहा महिन्याची आॅर्डर दिली.इतर वेळी त्यांच्याकडून तोंडी आदेशानेंच कामे करुन घेतली जातात.

काय म्हणतात नागरीक
- वर्षभर औषध फवारणी झालीच नाही.या तीन महिण्यात डेंग्यूचे रुग्णांची संख्या वाढल्याने तीन महिण्यात पहिल्यांदाच औषधफवारणी होत आहे.परिसरात गवत खूप वाढले.मच्छरांचा त्रास आहे.
सुभाष सोनवणे-श्रीकृष्णनगर एन 11 हडको-4131
- गेल्या उन्हाळयात भुमिगत गटाराचे काम केले.त्यात जुने पाईप टाकले.चेंबर बनवले पण ढापे टाकले नाहीत.जुन्या पाईपांना गळती लागली.दुर्गधीयुक्त पाणी उघडयावर वाहते.त्यामुळे डासांत भर पडली.
डी.बी.चव्हाण-4132 हडको एन 11

- पाण्यात टाकायचे औषध मेडीकलमधून आणावे लागत आहे.औषध मिळत नाही.धूरफवारणी होत नाही.
काशिनाथ सुरसे, हडको एन 12, 4138

- औषध फवारणी तीन महिण्यातून एकदा होते.अबेट पाण्यात टाकायचे औषध आठवडयाला एकदा मिळते धूर फवारणी होत नाही.
बंडू ढाकणे, विठ्ठलनगर एन 2, 4150

- अबेट ट्रिटमेंट महिण्यातून एकदा मिळते.मात्र वर्षभरात धूर फवारणी आणि औषधफवारणी होत नाही.संध्या वातावरण तापल्याने वर्षभरानंतर औषधफवारणीवाले नजरेत पडले.
दशरथ गुंठाळ, रामनगर, एन 2,4161

- रस्त्यांवर पावसाचे डांबके साचले आहे.औषधफवारणी होत नाही.
प्रतिभा जऱ्हाड, लोकशाही कॉलनी

आधी तुम्ही कारवाईचा फार्स केला, आता जनतेची फसवणूक केल्याचे वाटत नाही का?
वाटते ना, पण प्रशासनाने नव्या टेंडरची प्रक्रिया पूर्ण केली नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ती पूर्ण करणे आवश्यक होते.

वादग्रस्त ठेकेदारच काम करत आहेत....
फवारणी ही अत्यावश्यक सेवा आहे. अचानक बंद करता येत नाही. नवीन एजन्सी येईपर्यंत त्यांच्याकडून काम करून घेणार आहोत.

ठेकेदारांवर कारवाई करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था नसल्याचे आपनास माहीत नव्हते का ?
नाही, नंतर आयुक्त, आरोग्य अधिकारी यांनी एका बैठकीत सांगितले. येत्या पंधरा दिवसांत नव्याने निविदा मागवणार आहोत. या ठेकेदारांना कामे देणार नाहीत, त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांना काळ्या यादीत टाकू.
वर्षभरापासून आमची िबले काढली नाहीत. आमचा ठेका ६ आॅगस्ट २०१४ लाच संपला आहे. मलेरिया विभागामार्फत लेखी आदेश आले नाहीत. नवीन एजन्सी येईपर्यंत काम चालू ठेवा, असे तोंडी सांगितले आहे. सभापती, आरोग्य अधिकारी आयुक्तांनी पाहणी केली. अंगणवाडी सेविका, कॉलेजच्या महिलांची टीम तयार केली. सर्वत्र जनजागृती मोहीम चालू केली. आता आम्ही सुटीच्या दिवशीही काम करतो.

सर्व ठेकेदार
दोषी ठेकेदारांनाच काम देणे चुकीचे आहे. या ठेकेदारांनी औषध फवारणी कामात कुचराई केल्याचे नागरिकांच्या तक्रारीवरून सिद्ध झाले आहे. याबाबत मी आयुक्तांना या ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करण्याचे पत्र आजच देतो.
रावसाहेब गायकवाड, विरोधी पक्षनेता

नव्याने काम दिलेले नाही. त्यांच्या टेंडरची मुदत २० मे २०१३ लाच संपली आहे. नवीन आॅर्डर दिलेली नाही. तोंडी आदेशावर ते काम करत होते. साथ सुरू असताना काम बंद करता येत नाही. नवीन एजन्सी येईपर्यंत त्यांच्याकडून काम करून घेत आहोत. आयुक्तांच्या निर्देशानुसार कारवाई करणार. त्यांची बिले रोखून धरली आहेत. मी नव्यानेच या विभागाचा पदभार सांभाळला आहे. त्यामुळे इतर बाबी तपासून माहिती देते.
डॉ. संध्या टाकळीकर, प्रभारी आरोग्य अधिकारी