आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवळाईतील तरुणीचा डेंग्यू झाल्यामुळे मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात तीन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा डेंग्यूच्या डासांसाठी पोषक आणि नागरिकांसाठी घातक ठरला असून सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यातच संशयितांची संख्या १२ वर पोहोचली आहे. तिकडे देवळाई गावातील एका १७ वर्षीय तरुणीचा आज उपचारादरम्यान डेंग्यूने मृत्यू झाला आहे.
जून महिन्यापासून शहरात डेंग्यूची साथ चढत्या क्रमाने वाढत चालली आहे. फक्त शासकीय रुग्णालयाच्या अहवालावर विसंबून मनपा डेंग्यूच्या संशयितांची कमी संख्या सांगत असली तरी प्रत्यक्षात शहरात ही संख्या कैक पटीने अधिक आहे.

पाण्याचे कारण मुळाशी
आरोग्यविभाग काय करत आहे, असे महापौरांनी विचारल्यावर डाॅ. जगताप यांनी मोहीम राबवली जात असल्याचे सांगितले. शहरात पाणीपुरवठा अनिश्चित असल्याने लोक पाणी साठवून ठेवतात. त्यामुळे डेंग्यूचा फैलाव होण्यास मदतच होते, असे ते म्हणाल्यावर महापौरांनी त्यांना पाणीपुरवठा रोज किंवा एक दिवसाआड करणे शक्य नाही. त्यामुळे डेंग्यू रोखण्यासाठी काय करता, असे विचारले. त्यानंतर मलेरिया विभागप्रमुख डाॅ. जयश्री कुलकर्णी म्हणाल्या की, शहरात १६६ भाग अत्यंत धोकादायक म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. आणि या दोन प्रभागांत डेंग्यूचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण अधिक असल्याने तेथे धडक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. आॅक्टोबरपासून ही मोहीम सुरू होणार आहे.

कबाडीपुऱ्याचे नाव बदला
कबाडीपुरामधील हजरत शाह जमाल यांच्या दर्गामुळे तेथे मराठवाड्यातून भाविक येतात. त्यामुळे कबाडीपुऱ्याचे नाव त्यांच्या नावे ठेवावे, असा प्रस्ताव विरोधी पक्षनेते अयुब जहागीरदार यांनी मांडला आहे.

शहरात साथ सुरूच
डेंग्यूची साथ शहरात थांबलेलीच नाही. फक्त मनपाच्याच आकडेवारीवर विसंबून सांगायचे झाले तर जानेवारीत ७, फेब्रुवारीत ४, मार्च महिन्यात १, एप्रिल महिन्यात तर मे महिन्यात १५ संशयित डेंग्यू रुग्ण आढळले. त्यातील एकाचाही अहवाल पाॅझिटिव्ह आला नाही. मात्र जूनपासून साथ पसरली. साडेतीन महिन्यांत डेंग्यूचे १५१ रुग्ण आढळले, तर ३३ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले.

उपचार सुरू हाेते, पण...
देवळाईत राहणाऱ्या सादिया शेख या १७ वर्षीय तरुणीचा आज डेंग्यूने मृत्यू झाला. सादिया आपल्या कुटुंबासह राहत होती. डेंग्यूची लागण झाल्यावर तिला कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आज दुपारी नायगाव या मूळ गावी तिचा दफनविधी झाला.
महिन्यांतील संशयित पाॅझिटिव्ह
औरंगाबाद | मनपाआयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना शिवसेना भाजपच्या नेत्यांनी अभय दिल्याने अविश्वास ठरावाचा फुगा फुटला असून आता उद्या (दि. २० ) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक पदाधिकाऱ्यांना रस्ते, खड्डे डेंग्यू या नागरिकांच्या हिताच्या विषयांवर बाेलणे भाग पडणार आहे. मानापमानाच्या नाट्यात नागरिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडून आयुक्तांच्या विरोधात मागची सर्वसाधारण सभा वाया गेली. खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर असताना विषय तिसरीकडेच गेला शेवटी खड्डे तसेच ठेवत सभा संपली होती. त्यानंतर आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची डरकाळी फोडणाऱ्यांना त्यांच्याच नेत्यांनी गप्प बसवले. नेत्यांनीच बकोरियांना त्रास देऊ नका असे अप्रत्यक्ष सुचवल्याने आता बकोरियांच्या बाबतीत पदाधिकाऱ्यांना नरम व्हावे लागले आहे. त्यामुळे उद्या (दि. २०) होणाऱ्या बैठकीत नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर चर्चा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, डेंग्यूची पसरलेली साथ हे प्रश्न सध्या ऐरणीवर असून त्यावर नगरसेवक प्रशासनाला घेरण्याच्या तयारीत आहेत. त्याशिवाय विषय पत्रिकेत सीएसआरमधून पे अँड यूज स्वच्छतागृहे बांधण्यासाठी पुढे येणाऱ्यांना मनपातर्फे जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच नारेगावातील कचरा डेपो बंद करून प्रक्रिया प्रकल्पासह कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा मागण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. या जागांत तिसगाव, सावंगी, आडगाव बुद्रुक, खांडेवाडी अथवा नायगव्हाण येथील जागा सुचवण्यात आल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...