आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच लाख घरांचे करणार सर्वेक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डेंग्यूची साथ रोखण्यासाठी मनपा मोहिमेदरम्यान शहरातील अडीच लाख घरांचे सर्वेक्षण करणार आहे. शिवाय आतापर्यंत एकूण 75 हजार घरांची तपासणी करण्यात आली असून 71 हजार घरांत प्रतिबंधक उपाय करण्यात आले आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी ही माहिती दिली. या वेळी जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी डेंग्यूबाबत जनजागरण मोहीम हाती घेण्याबाबत सूचना केल्या. शहरातील सगळ्या चित्रपटगृहांत आणि स्थानिक वाहिन्यांवर डेंग्यू रोखण्याबाबत दोन मिनिटांचा लघुपट दाखवण्याचे निर्देश त्यांनी दिले. मनपा आयुक्तांनी मोहिमेची माहिती दिली. ते म्हणाले, औषध फवारणीसाठी 25 मशिन्सची खरेदी केले आहेत.

श्री संप्रदायातर्फे स्वच्छता मोहीम : जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज भक्त सेवा मंडळाच्या (श्री संप्रदाय) वतीने सिडको एन-11 परिसरात स्वच्छता व जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली. खासदार चंद्रकांत खैरे, नगरसेवक किशोर नागरे, राज वानखेडे, महेश माळवतकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत या मोहिमेला प्रारंभ झाला. त्यात श्री संप्रदायाच्या वतीने एक घंटागाडी, दहा डस्टबिन, पाच टोपली, पाच फावडे, शंभर झाडू हे साहित्य मनपाच्या स्वच्छता निरीक्षकाला देण्यात आले. कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन 2 हजार पत्रके वाटली. तसेच रस्ते, डबकी, घनकचरा, नाल्यांची सफाई केली.