आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य - वाळूज परिसरात डेंग्यूचे थैमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बजाजनगरात आतापर्यंत डेंग्यूने तीन बळी घेतले, तरीही प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत. दरम्यान, डेंग्यू आजाराने बजाजनगर, पंढरपूरनंतर आता वाळूज गावात थैमान घातले आहे.
पंढरपूर आणि वाळूज भागात अनेक नागरिक ताप, अंगदुखीच्या विकाराने त्रस्त आहेत. जवळपास अर्धे वाळूज गाव आजारी असून एकाच कुटुंबातील 16 जणांना ताप असल्याचे येथील नागरिक हूर खान पठाण यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरात डेंग्यू आजाराचे तीन तसेच बजाजनगर परिसरात तीन बळी गेले आहेत. मात्र, डेंग्यूवर प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजना करण्यात आलेली नाही. शहराच्या तुलनेत बजाजनगर आणि परिसरात स्थानिक ग्रामपंचायत, एमआयडीसी आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचा अरोप नागरिकांनी केला आहे. वाळूज ग्रामपंचायतीकडून गावात आरोग्यविषयक शिबिर घेणे अपेक्षित आहे. तसेच गावातील कच-याची योग्य विल्हेवाट लावण्याकडेही ग्रामपंचायत दुर्र्लक्ष करत असल्याचा आरोप पठाण यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.

एकाच कुटुंबातील 16 आजारी
हूर खान पठाण यांच्या कुटुंबीयातील मेहरीन, फरहान, तोहरीण, इमशाद, इसराल, फ रीन, तुबा, बिलाल, कश्मिरा या सर्वाच्या शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होत आहे. त्यांना ताप, डोकेदुखीच्या विकाराने ग्रासले आहे. या सर्वावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी केली जात आहे.

आरोग्य केंद्रातील कर्मचारी वाढवा
जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पाठीमागील भागात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. मात्र हे आरोग्य उपकेंद्र कसे-बसे आठवड्यातून दोन दिवसच सुरू असते. गावात अनेकांना ताप असताना आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी संख्या वाढवून उपकेंद्र कायमस्वरूपी सुरू ठेवण्याची मागणी केली जात आहे.

सोमवारी आणि मंगळवारी होते औषधी वाटप
- आरोग्य उपकेंद्रात ताप, अंगदुखी, जुलाब लागण्याच्या तक्रारीचे रुग्ण येत आहेत. त्यांना पॅरॅसिटामोल गोळ्या व सिरप, क्लोरोक्वीन गोळ्या, ओआरएसची पावडर अशा औषधीचे वाटप केले जात आहे. सोमवारी आणि मंगळवारी हे वाटप केले जाते. इतरवेळी लांझी, नारायणपूर, पिंपरखेडा व शिवराई ही गावे करावी लागतात. एस. आर. भालेराव, आरोग्यसेविका,
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, वाळूज
आजपासून करणार धूर फवारणी
- ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कचरा उचलण्याची कामे नियमित सुरू आहेत. तसेच डेंग्यू आणि गावात वाढणा-या साथीच्या आजाराची शक्यता गृहीत धरून गावांत बुधवारपासून धूर फवारणी केली जाणार आहे.इतरही उपाय केले जातील. रंजना भोंड, सरपंच, वाळूज ग्रामपंचायत