आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेविका सविता घडामोडे यांना डेंग्यू; मुलगाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डेंग्यूची साथ आटोक्यात आल्याचा मनपाचा दावा फोल ठरला असून नगरसेविका व भाजप शहराध्यक्ष बापू घडामोडे यांच्या पत्नी सविता घडामोडे व मुलगा गजानन घडामोडे यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांना धूत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मागील दोन महनि्यांपासून शहरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. आतापर्यंत एन-९ आणि एन-११ या दोन भागांत डेंग्यूचा फैलाव अधिक झाल्याचे समोर आले होते. पण नंतर शहराच्या सर्वच भागांत डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढत आहे. मनपाने मोहीम हाती घेऊनही त्याचा परिणाम होताना दिसत नाही. आज तर चक्क विठ्ठलनगर वॉर्डाच्या नगरसेविकेलाच डेंग्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यांना धूत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांना गेल्या चार-पाच िदवसांपासून ताप असून आज त्यांच्या वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या. त्यात डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याचे बापू घडामोडे यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले. ते म्हणाले की, मुलगा गजानन यालादेखील डेंग्यू झाला असून त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांनी सांगितले की, मनपाने हाती घेतलेली मोहीम अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत शहरात या मोहिमेअंतर्गत सर्दी-तापासह तापाचे रुग्ण ७६९ असल्याचे समोर आले आहे. तसेच डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या २६ असून त्यापैकी ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.