आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dengue Patient Found In Sillod Taluka Aurangabad District

सिंदेफळ गावात डेंग्यूचे थैमान, आरोग्य विभाग गावात तळ ठोकून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमठाणा - सिल्लोड तालुक्यातील आमठाण्यापासून जवळ असलेले सिंदेफळ गाव सध्या डेंग्यूच्या साथीने त्रस्त आहे. औरंगाबादेत दाखल एका रुग्णास डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून सध्या गावात तळ ठोकून आहे.
सिंदेफळ गावातील शालिक साळवे यांना 29 एप्रिल 2014 रोजी औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रक्ताची तपासणी केली असता त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर बाजीराव अक्कलकर, सविता अक्कलकर, संतोष अक्कलकर यांनाही औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर शालिक साळवे यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. दरम्यान, डेंग्यूची साथ पसरल्याने आरोग्य विभागाचे कर्मचारी बुधवारी सिल्लोड येथून तालुका अधिकारी डॉ. मेहर यांचे पथक दुपारी सिंदेफळ येथे दाखल झाले. त्यापाठोपाठ सिल्लोड ग्रामीण रुग्णालय, आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे व वैद्यकीय कर्मचारी सिंदेफळ येथे दाखल झाले. त्यामुळे सिंदेफळ गावास छावणीचे स्वरूप आल्याचे दिसत होते.
रुग्ण खासगी रुग्णालयात
डेंग्यूची लागण झालेले रुग्ण एकापाठोपाठ शहरातील खासगी रुग्णालयात भरती होत आहेत. सहायक संचालक डॉ. भटकर यांनी 6 मे रोजी पेहरकर वस्तीला भेट देऊन डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनेची पाहणी केली. तसेच वस्तीवर दक्षता पथक 24 तास ठेवण्याच्या सूचना त्यांनी स्थानिक आरोग्य अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

कर्मचारी आले, परंतु तपासणी केली नाही
आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकार्‍यांना 7 रोजी फोनवरून माहिती दिली होती. त्यांचे काही कर्मचारी गावात येऊन गेले. मात्र, तपासणी वगैरे काहीही झालेली नव्हती, अशी तक्रार काही ग्रामस्थांनी या वेळी केली.
आम्ही पूर्ण गावाची तपासणी केली असून 20 ते 25 लोकांचे रक्तनमुने पुणे येथील नॅशनल लॅबला पाठवणार आहोत. पुढील रिपोर्ट प्राप्त होईपर्यंत गावात डॉक्टरांची एक टीम राहील नागरिकांनी घाबरून न जाता पाणी साठवण्याची साधने कोरडी करावीत. - डॉ. मेहर, आरोग्य अधिकारी
माझा पुतण्या तापाने सतत फणफणत होता. त्याला औरंगाबादेतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. त्यास डेंग्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आम्ही पाणी साठवण्याची भांडी कोरडी करून ठेवली आहेत. - अनिल अक्कलकर, ग्रामस्थ