आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूचे रुग्ण घरी परतल्यावर महिनाभराने पाॅझिटिव्ह रिपाेर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात डेंग्यूचे ७२ संशयितांपैकी आठ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळे असले तरी हे सर्वच रुग्ण बरे होऊन घरी गेले आणि आता घाटी रुग्णालयाने त्या रुग्णांच्या रक्ताच्या तपासणीचा अहवाल महिनाभरानंतर पाठवला आहे. चाचणीसाठी जे किट लावले जाते त्यामध्ये सॅम्पल्स एकावेळी लावावे लागतात. प्रत्यक्ष चाचणी करण्यासाठी तासांचा अवधी लागतो. पण, एकाच वेळी सॅम्पल मिळत नाहीत. उपचाराची दिशा ठरविण्यासाठी आवश्यक असलेला रिपोर्ट वेळेवर मिळत नाही.

साधारत: सॅम्पल गोळा झाले की चाचणीला किट लावली जाते. खाजगीमध्ये हे शक्य होत नाही. कारण त्यांची किट वाया जात असल्याने ही चाचणी केलीच जात नाही. तेथे रॅपिड टेस्ट केली जाते, अशी माहिती घाटीतील अधिकृत सूत्रांनी दिली. पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात शहराचे आरोग्य धोक्यात आले अाहे. सध्या शहरात डेंग्यूचे ७२ संशयित रुग्ण असून त्यापैकी जणांचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने धोक्याची घंटा वाजली आहे. दुसरीकडे काॅलरा, गॅस्ट्रोचे रुग्णही वाढत असून संपूर्ण पावसाळा जाणे बाकी आहे.

पावसाळापूर्व तयारीत कागदावर काटेकाेर नियोजन दिसणाऱ्या मनपाच्या आरोग्य विभागाचे पितळ पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यातच उघडे पडले आहे. शहरात पावसाळ्याआधीपर्यंत डेंग्यूचे ६० रुग्ण संशयित आढळले होते. पैकी फक्त एकाचाच अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. मात्र गेल्या पंधरवड्यात सारेच चित्र बदलले असून डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या ७२ वर पोहोचली आहे. त्यापैकी २९ जणांच्या रक्तांचे नमुने मनपामार्फत शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. काल त्यापैकी आठ रुग्णांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

हा प्रकार धोक्याची घंटाच असून डेंग्यूला वेळीच आवर घातला नाही तर शहरात भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. आज महापौर त्र्यंबक तुपे यांच्या दालनात झालेल्या साप्ताहिक आढावा बैठकीतही आरोग्य विभागाचा विषय पुन्हा चर्चेला आला.

अशी घ्या दक्षता
डेंग्यूचा फैलाव साठवून ठेवलेल्या पाण्यातून होतो. त्यामुळे नागरिकांनी घरात, ड्रममध्ये पाण्याचे साठे करू नयेत असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले.

अॅबेट टाकणे सुरू
मुख्य आरोग्य अधिकारी डाॅ. सुहास जगताप यांनी धोकादायक असणाऱ्या भागांत अॅबेट फवारणीचे काम कोम्बिंग आॅपरेशनच्या धर्तीवर राबवत असल्याचे सांगितले. आज एन-११ भागात अॅबेटचे काम करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. या कामासाठी अतिरिक्त २५ मजूर घेण्यात आल्याचेही ते म्हणाले.

वाॅर्डनिहाय पथक
शहराच्या काही भागांतच डेंग्यूचे रुग्ण जास्त आहेत, काही ठिकाणी तर मृत्यूही झाले आहेत. खासगी रुग्णालयांनी डेंग्यूच्या रुग्णांची माहिती देण्याबाबत त्यांना आदेश देण्याच्या सूचना केल्या. तसेच साथरोग नियंत्रणासाठी वाॅर्डनिहाय पथक नेमण्याचे त्या पथकातील कर्मचाऱ्यांची नावे नंबर नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेशही महापौरांनी दिले. -त्र्यंबक तुपे, महापौर, मनपा
बातम्या आणखी आहेत...