आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहरात डेंग्यूचा विळखा अजूनही कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहर आणि परिसराला अजूनही डेंग्यूचा विळखा कायम आहे. शहरालगतच्या वाळूज एमआयडीसी भागासह गारखेडा, विश्वभारती कॉलनी, ज्योतीनगर आणि इतर ठिकाणचे डेंग्यू व डेंग्यूसदृश रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही जालना, बीड, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांचे रुग्ण शहरात उपचारासाठी येत असले, तरी कन्नडचे रुग्ण या वर्षी फार मोठय़ा संख्येने शहरात उपचार घेत असल्याचे वैद्यकीय वतरुळातून सांगण्यात आले. डेंग्यूबरोबरच न्यूमोनिया, सर्दी-खोकला व विषाणुजन्य तापाने रुग्ण बेजार असल्याचे सांगण्यात आले.

या संदर्भात शहरातील अमृत बाल रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास रोटे म्हणाले, या वर्षी जुलैपासून डेंग्यूचे रुग्ण बर्‍यापैकी दिसू लागले. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रुग्णांची संख्या चांगलीच वाढली होती. सप्टेंबरमध्ये पाऊस कमी होताच रुग्णसंख्या कमी झाली आणि पाऊस सुरू होताच पुन्हा वाढल्याचे चित्र होते.

आता पुन्हा मागच्या चार-सहा दिवसांपासून रुग्ण कमी होत असल्याचे चित्र आहे. तरीही सध्या आमच्या रुग्णालयात चार-पाच डेंग्यू पॉझिटिव्ह व तितकेच डेंग्यूसदृश रुग्ण दाखल आहेत. संजीवनी बाल रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत जाधव यांच्यानुसार, डेंग्यूचे रुग्ण काही दिवसांपासून वाढले आहेत. तीन-चार रुग्ण दाखल असल्याचे त्यांनीही सांगितले.