आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होमिओपॅथीमध्ये डेंग्यूवर उपचार शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या महनिाभरात शहरात डेंग्यूमुळे सात जणांनी जीव गमावला. डासामुळे होणार्‍या या रोगात रक्तातील पविळ्या पेशींची (पांढर्‍या पेशी) संख्या झपाट्याने कमी होते. यामुळे मृत्यू ओढवतो, पण होमिओपॅथीच्या जनसि इपिडेमसि थेअरीनुसार डेंग्यूमध्ये पेशी वाढवणारी औषधी उपलब्ध असल्याचा दावा डॉ. संजय पडोळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

या वेळी डॉ. अजय माने, डॉ. विजय लोखंडे, डॉ. योगेश खर्चे आिण डॉ. सचनि लाेखंडे यांची उपस्थतिी होती. डॉ. पडोळे म्हणाले, डेंग्यूच्या रुग्णांना डास चावल्यानंतर साधारणत: ४ ते ९ दवसिांत ताप येतो. अंगावर पुरळ येणे, हातपाय दुखणे ही त्याची प्राथमिक लक्षणे आहेत. ताप वाढताच रुग्ण आयसीयूमध्ये दाखल होतात, झपाट्याने पेशी कमी होऊ लागल्याने घबराट निर्माण होते. होमिओपॅथी औषध घेतल्यानंतर दोन दवसिांमध्ये पेशी वाढण्याला सुरुवात होते. अॅलोपॅथी औषधी सुरू असतानाच ही औषधे घ्यावीत, उपचार बंद करण्याची गरज नसल्याचे डॉ. पडोळे यांनी सांगतिले. डॉ. माने म्हणाले, अॅलोपॅथी आणि होमिओपॅथीची सांगड घालून उपचार केल्यास रुग्णांना लवकर दिलासा मिळू शकतो. या औषधोपाचाराचा कुठलाही दुष्परिणाम शरीरावर होत नाही. होमिओपॅथी आजारावर उपचार करत नसून शरीरावर उपचार करणारे शास्त्र आहे. दलि्लीमध्ये याविषयी प्रयोग करण्यात आले असून आपल्या शहरातही याचा फायदा रुग्णांना होऊ शकतो.

डॉ. लोखंडे म्हणाले, डेंग्यूप्रमाणेच इबोलावरही होमिओपॅथी काम करते. त्यावरही औषध उपलब्ध आहे. डेंग्यूची लागण गर्भवती आईकडून मुलास, रक्तातून तसेच डास चावल्याने होते. या औषधाचे वैशिष्ट्य असे की, ज्यांना डेंग्यूची लागण आहे, त्यांच्या पेशी वाढून रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते. तर ज्यांना लागण झालेली नाही त्यांनीही औषध घेतल्यास त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढल्याने लागण होत नाही. कुठलाही दुष्परिणाम नसलेले हे औषध प्रभावशाली असून आतापर्यंत चार ते पाच रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.