आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववर्षापासून दंतोपचार शुल्कात येणार समानता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दंतवैद्य शास्त्रात प्रामुख्याने करण्यात येणाऱ्या दंत स्वच्छता, रूट कॅनॉल, चांदी भरणे अशा उपचारांसाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून वेगवेगळे शुल्क आकारले जाते. यामुळे सामान्य नागरिकांत दंतवैद्यकशास्त्राबद्दलच संशयाचे वातावरण आहे. त्यामुळे लवकरच दंतोपचार शुल्कात समानता आणू, असा दावा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हिमांशू गुप्ता यांनी केला.
डॉ. गुप्ता म्हणाले, भारतीय दंतवैद्यक असोसिएशनच्या औरंगाबाद शहर शाखेत एकूण २७० सदस्य आहेत. शहर आणि वाळूज परिसर मिळून ४५० दंततज्ज्ञ कार्यरत आहेत. आतापर्यंत या उपक्रमात ७० ते ८० डॉक्टरांनी सहमती दर्शवली आहे. लवकरच बाकीचेही सहभागी होतील. पुढील काही महिन्यांत नेमके दर किती असावेत, उपचार कसे करावेत याविषयीच्या मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

डॉ. प्रणव महाजन म्हणाले, दर महिन्यांनी दात साफ करून घेणे, तपासणी करून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे गंभीर समस्या उद््भवण्यापूर्वीच ती थांबवता येईल. पण, खर्च जास्त असल्याने लोक समस्या गंभीर होईपर्यंत आमच्याकडे येतच नाहीत. याचे प्रमुख कारण उपचारांसाठी लागणारा खर्च आहे. म्हणून आम्ही दरात समानता आणणे आणि ते सर्वांना सहज परवडण्याजोगे ठेवण्यावर विचार करत आहोत. यामुळे एकूणच समाजाचे दंत आरोग्य सुधारेल.
शुल्कातअसमानता : दंतोपचारांचेशुल्क तज्ज्ञपरत्वे वेगवेगळे आहे. रुट कॅनाॅलसाठी शहरातील तज्ज्ञांकडून १५०० ते २००० , कंपोझिट (सिमेंट भरणे) ४०० ते ६००, अक्कलदाढ काढणे १५०० ते २०००, ऑर्थो (दातांना क्लिप) १६ हजार ते २० हजार रुपये आकारले जातात, अशी माहिती दंतवैद्य डॉ. भूषण धनेगावकर यांनी दिली. शुल्कांत एकसमानता आणल्यास रुग्णांना नक्कीच लाभ होईल, असेही ते म्हणाले.

शासकीय यंत्रणा अपुरी
शासकीय दंत रुग्णालयात अत्यल्प दरात उपचार मिळतात, तर खासगी दवाखान्यांत तीन ते पाचपट जादा खर्च सोसावा लागतो. त्यामुळे नक्की दर किती, असा प्रश्न उपस्थित होतो. शासकीय रुग्णालयात कमी खर्च असल्याने रुग्ण तेथे जातात, पण तुलनेने यंत्रणा कमी पडते अन् महिनोन््महिने रुग्णांना दंतोपचारांसाठी ताटकळावे लागते.
बातम्या आणखी आहेत...