आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सृजन केंद्रीय युवक महोत्सव: 27 पारितोषिके पटकावत देवगिरी महाविद्यालय अव्वल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सृजन२०१७ या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित केंद्रीय युवक महोत्सवाचा बुधवारी दुपारी बक्षीस समारंभाने थाटात समारोप झाला. यात औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयाचा संघ सर्वोत्कृष्ट ठरला. या संघाने तब्बल २७ पुरस्कार पटकावले.
 
ग्रामीण भागातून उत्कृष्ट संघ म्हणून फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाला पुरस्कार मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात तरुणाईने जल्लोष करत पारितोषिके स्वीकारली. या स्पर्धकांनी जड अंत:करणाने विद्यापीठ परिसराला अलविदा केल्याने गेले तीन दिवस गजबजलेला विद्यापीठ परिसर सुनसान झाला. २९ ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत विद्यापीठ परिसरात ‘सृजन २०१७’ या केंद्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद येथील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे संघ सहभागी झाले होते. ३९ कला प्रकारांत स्पर्धा घेण्यात आल्या. 

महोत्सवावर देवगिरीची मोहोर 
औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाने संगीत, नाट्य, ललित कला गट, महाराष्ट्राची लोकधारा यात सर्वाधिक बक्षिसे मिळवत सर्वोत्कृष्ट संघाचे बक्षीस पटकावले. या महाविद्यालयाने कै.जगन्नाथराव नागापुरे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा फिरता चषकही मिळवत केंद्रीय युवक महोत्सवावर मोहोर उमटवली. 

या स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे... 
नाट्यगट :
(उत्कृष्टअभिनय पुरुष ) यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (प्रथम), देवगिरी महाविद्यालय (द्वितीय), बलभीम महाविद्यालय, बीड(तृतीय). (उत्कृष्ट अभिनय स्त्री) : या गटात सौ.केएसके महाविद्यालय, बीड (प्रथम), छत्रपती महाविद्यालय, औरंगाबाद (द्वितीय), स.भु.विज्ञान महाविद्यालय (तृतीय ). उत्कृष्ट दिग्दर्शन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ(प्रथम), सौ.केएसके महाविद्यालय, बीड (द्वितीय), विवेकानंद महाविद्यालय (तृतीय). उत्कृष्ट संहितालेखन : बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना (प्रथम), जेईएस महाविद्यालय, जालना (द्वितीय), योगेश्वरी महाविद्यालय, बीड (तृतीय). 
 
शोभायात्रा : याप्रकारात राजर्षी कला शाहू महाविद्यालय पाथ्री, फुलंब्री (प्रथम), डी.वाय.पाथ्रीकर कॉलेज, औरंगाबाद (द्वितीय), देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद (तृतीय ) 
 
संगीत गट : यातशास्त्रीय गायन प्रकारात विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद (प्रथम), स.भु. विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद (द्वितीय), इं.भा.पाठक महाविद्यालय, औरंगाबाद (तृतीय) ठरले. 
 
उपशास्त्रीय गायन : यातस.भु विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद (प्रथम), विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद (द्वितीय), इं.भा.पाठक महाविद्यालय (तृतीय) शास्त्रीय तालवाद्य प्रकारात सौ.के.एस.के. महाविद्यालय, बीड ( प्रथम), बलभीम महाविद्यालय, बीड(द्वितीय), शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद (तृतीय). 
 
शास्त्रीय सूरवाद्य : शासकीयज्ञान-विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद (प्रथम), मौलाना आझाद महाविद्यालय, औरंगाबाद (द्वितीय), सौ.के.एस.के महाविद्यालय, बीड (तृतीय). 

सुगम गायन भारतीय : याप्रकारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघ (प्रथम), इं.भा.पाठक महाविद्यालय, औरंगाबाद (द्वितीय), तर स.भु. विज्ञान महाविद्यालयाला तृतीय पुरस्कार मिळाला. 
 
सुगम गायन पाश्चात्त्य : या कला प्रकारात देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद (प्रथम), स.भु.कला वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद (द्वितीय) तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला तृतीय पुरस्कार मिळाला. 
 
सुगमगायन भारतीय : यातस.भु.वाणिज्य महाविद्यालय, औरंगाबाद (प्रथम), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (द्वितीय), तर शिवाजी महाविद्यालय, कन्नड (तृतीय) ठरले. 
 
समूह गायन पाश्चात्त्य : यात देवगिरी महाविद्यालय (प्रथम), विवेकानंद (द्वितीय), सौ.के.एस.के. महाविद्यालय, बीड (तृतीय) ठरले. 
 
लोकवाद्यवृंद: या कला प्रकारात शिवाजी महाविद्यालय, कन्नड (प्रथम), देवगिरी महाविद्यालय (द्वितीय), सौ.केएसके महाविद्यालय, बीड(तृतीय ) ठरले. 

नृत्यगट : (लोकनृत्य,आदिवासी नृत्य) यात यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर (प्रथम), श्रीकृष्ण महाविद्यालय गुंजोटी, उमरगा (द्वितीय), विवेकानंद महाविद्यालय, औरंगाबाद(तृतीय). 
 
शास्त्रीयनृत्य : याप्रकारात स.भु.विज्ञान महाविद्यालय (प्रथम), शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालय, औरंगाबाद (द्वितीय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (तृतीय). 
 
एकांकिका: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (प्रथम), सौ.केएसके महाविद्यालय, बीड (द्वितीय), देवगिरी महाविद्यालय (तृतीय). 
 
प्रहसन: देवगिरीमहाविद्यालय (प्रथम), सौ.केएसके महाविद्यालय, बीड(द्वितीय), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (तृतीय). 
 
मिमिक्री: याप्रकारात देवगिरी महाविद्यालय (प्रथम), स्वामी विवेकानंद महाविद्यालय, परळी वैजनाथ (द्वितीय), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद (तृतीय). 
 
मूकाभिनय: विवेकानंदमहाविद्यालय, औरंगाबाद (प्रथम), देवगिरी महाविद्यालय (द्वितीय), स.भु.कला, औरंगाबाद सौ. केएसके महाविद्यालय, बीड विभागून (तृतीय). 
 
ललित कला गट : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (प्रथम), देवगिरी महाविद्यालय (द्वितीय), स्वामी विवेकानंद महाविद्यालय, बीड (तृतीय). 

कोलाज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (प्रथम), देवगिरी महाविद्यालय (द्वितीय), जीवनदीप महाविद्यालय, पिंपळनेर, बीड (तृतीय). 
 
पोस्टर: याप्रकारात स्वामी विवेकानंद महाविद्यालय (प्रथम), मृदामूर्तिकला प्रकारात शासकीय अध्यापक महाविद्यालय प्रथम, व्यंगचित्र कला प्रकारात देवगिरी महाविद्यालयाने पहिला क्रमांक पटकावला, इन्स्टॉलेशन प्रकारात देवगिरी प्रथम, स्पॉट फोटोग्राफी प्रकारातही देवगिरी महाविद्यालयाने प्रथम पुरस्कार पटकावला. 
 
काव्य वाचन: वसुंधरामहाविद्यालय घाटनांदूर, बीड प्रथम, वादविवाद स्पर्धेत बलभीम कॉलेज, बीड प्रथम ठरले तर वक्तृत्व स्पर्धेत औरंगाबादच्या विवेकानंद महाविद्यालयाने प्रथम पुरस्कार पटकावला. प्रश्नमंजूषा प्रकारात जेईएस महाविद्यालय, जालना, महाराष्ट्राच्या लोककला प्रकारात देवगिरी महाविद्यालय, तर भारुड प्रकारातही देवगिरी महाविद्यालयाने प्रथम पुरस्कार पटकावला. वासुदेव प्रकारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, गोंधळ प्रकारात देवगिरी महाविद्यालय, भजन प्रकारात राजर्षी शाहू कॉलेज, पाथ्री तर लोकगीत प्रकारात देवगिरी महाविद्यालय प्रथम तर लोकनृत्यात विवेकानंद कॉलेज, औरंगाबादने प्रथम क्रमांक पटकावला. लावणी प्रकारात सौ.केएसके बीड प्रथम, विवेकानंद महाविद्यालय यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, तुळजापूर यांना द्वितीय विभागून तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ देवगिरी महाविद्यालयाला तृतीय पुरस्कार विभागून मिळाला. 
 
बातम्या आणखी आहेत...