आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Department Of Health,,Latest News In Divya Marathi

संतप्त बजाजनगरवासीयांचा आरोग्य विभागापुढे ठिय्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- मागील चार दिवसांमध्ये दोघांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्यामुळे बजाजनगर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आरोग्य विभागाकडून अद्यापही परिसरामध्ये उपाययोजना करण्यात येत नाही. या संदर्भात जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आरोग्य विभागासमोर ठिया आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत पथकाने परिसराची पाहणी केली.काँग्रेसचे संजय तायडे, जनार्दन निकम यांच्या नेतृत्वाखाली पदाधिका-यांनी सोमवारी सकाळी
जि. प. आरोग्य विभागात अधिका-यांना प्रत्यक्ष पाहणी करण्याचा तगादा लावला. त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी बजाजनगरात पाहणीसाठीपथक पाठवले. त्याबाबतचे निवेदन डॉ. जमादार यांना देण्यात आले. या निवेदनावर शरद जाधव, राजू डोईफोडे, काकासाहेब सुलताने, बंडू पुरी, प्रकाश निकम, नामदेव मानकापे, दुर्गा निंबूळकर, सुनंदा कुदळे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

दोन रुग्ण डेंग्यूग्रस्त
जि. प. आरोग्य विभागाने परिसरातील चार आजारी रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीक रिता घेतले होते. त्यातील दोन रुग्ण डेंग्यूग्रस्त असल्याची माहिती डॉ. बाविस्कर यांनी दिली.
पथकाकडून परिसराची पाहणी
अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एच. बावीसकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. ए. एस. कुलकर्णी, डॉ. डी. बी. घोलप, डॉ. बामणे आदींच्या पथकाने या परिसराची पाहणी केली.