आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर टाकलेल्या खडीमुळे वाहनधारक पडताहेत घसरून, रस्त्याचे काम तत्काळ करण्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आंबेडकर चौक ते पिसादेवी रस्त्याचे काम विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले, परंतु निवडणुकीनंतर या रस्त्याचे काम अर्धवट सोडून दिले आहे. वैशाली ढाबा चौक ते आंबेडकरनगर या रस्त्यापर्यंत रस्त्याच्या कडेला सहा महिन्यांपासून खडी टाकण्यात आली आहे. या रस्त्यावरून दूध आणि भाजी विक्रेत्यांची मोठी वर्दळ असते. रस्त्यावरील खडीमुळे वाहनधारक घसरून पडत आहेत.
आंबेडकर चौक ते पिसादेवी रस्त्याचे काम रखडल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे. सकाळपासूनच या रस्त्यावरून भाजीपाला, दूध विक्रेते मोंढ्याकडे जाण्याची वर्दळ असते. शाळकरी मुलांच्या ऑटोरिक्षा, पारदेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येणारे भाविक आणि त्याबरोबरच पन्नास हजारांपेक्षा अधिक लोक या भागाकडे राहतात. सहा महिन्यांपासून रस्त्याचे डांबरीकरण झालेले नसल्यामुळे खड्डेमय रस्त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीमुळे वाहनधारक रात्रीच्या वेळी घसरून पडत आहेत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या असून या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी उद्धव डोंगरे, शेख मोहंमद कासम, कांताराम जाधव, संजय भागवत, सुधाकर साठे यांनी केली आहे. खडीमुळे वाहनधारक पडताहेत.
डांबर मिळत नसल्याने रखडले काम
रस्त्याच्या कामासाठी ठेकेदाराला डांबर मिळत नसल्याने काम रखडले आहे. मुंबईहून रिफायनरी करून डांबर आणावे लागते. हा रस्ता अर्थसंकल्पीय तरतुदीतून करण्यात येत आहे. कोणत्याही आमदार, खासदार निधीतून केला जात नाही. रस्त्यावर पडलेली खडी बाजूला करत असून डांबर उपलब्ध केल्यास लवकरात लवकर काम सुरू केले जाईल. - के. टी. वाघ, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग