आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेप्यूटी सीईअाे लाच प्रकरण: कापडणे जि. प. शाळेच्या रजिस्टरमध्ये प्रत्येक पानावर सापडली खाडाखोड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कापडणे- पंचायत राज समितीचे सदस्य आमदार हेमंत पाटील यांना दीड लाखांची लाच देताना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना शुक्रवारी पकडण्यात आले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने शनिवारी धुळे तालुक्यातील कापडणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक एकची तीन तास तपासणी केली. तपासणीत पाेषण अाहार तांदळाच्या रजिस्टरमधील प्रत्येक पानावर खाडाखाेड अाढळली. शाळा क्रमांक दोनची तपासणी मुख्याध्यापक नसल्याने साेमवारी केली जाणार अाहे. 

एसीबीचे पथक शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कापडणे ग्रामपंचायत कार्यालयात गेले. त्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच उपस्थित हाेते. मात्र, ग्रामसेेवक राजेंद्र कुंवर उपस्थित नसल्याचे पथकाने ग्रामसेवकाशी संपर्क साधत त्यांना शाळेत बोलावून घेतले. त्यानंतर पथकाने शाळा क्रमांक एक येथे जाऊन शाळेची तपासणी केली. शाळेतील पाेषण अाहाराबाबतच्या नाेंदणीचे रजिस्टर तपासले. या रजिस्टरमधील प्रत्येक पानावर खाडाखाेड तसेच अनेक ठिकाणी व्हाइटनर लावून वेगळी नाेंद केल्याचे दिसून अाले. पथकाने शाळेच्या मुख्याध्यापकाकडे चाैकशी केली. पथकात एसीबीचे पोलिस निरीक्षक पवन देसले, पोलिस नाईक कैलास शिरसाठ, पाेलिस काॅन्स्टेबल संतोष हिरे, कृष्णकांत वाडिले, प्रदीप देवरे, वाय. एन. केदार आदींचा समावेश होता. 

लाच देणाऱ्या डेप्यूटी सीईअाे माळीला पाेलिस काेठडी 
जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी याची १२ जुलैपर्यंत पाेलिस काेठडीत रवानगी केली अाहे. माळी याला शनिवारी दुपारी न्यायालयासमाेर हजर करण्यात अाले. सरकारी वकील नीलेश कलाल यांनी गुन्ह्याची व्याप्ती माेठी असल्याने माळीला पाेलिस काेठडी द्यावी, अशी मागणी केली. न्यायालयाने दाेन्ही बाजूचे म्हणणे एेकून घेऊन तुषार माळी याला १२ जुलैपर्यंत पाेलिस काेठडी दिली. 
बातम्या आणखी आहेत...