आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deputy Chief Minister, Minister For The City With 10

उपमुख्यमंत्र्यांसह 10 मंत्री आज शहरात-नियोजन समिती आराखड्याचा घेणार आढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या जिल्ह नियोजन समितीच्या मागील वर्षाच्या आराखड्याचा आढावा घेण्याबरोबरच पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्यासाठी विभागीय आयुक्तालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक होत आहे. त्यासाठी अर्थमंत्री या नात्याने अजित पवार, अर्थराज्यमंत्री उदय सामंत यांच्यासह प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री शहरात येत आहे.

दुपारी 4.15 वाजता बैठकीला सुरुवात होणार असून रात्री बैठक संपल्यानंतर 8 वाजता अजित पवार हे पत्रकार परिषदेला सामोरे जातील. अर्थमंत्री दरवर्षी नियोजन समितीच्या अंदाजपत्रकाचा आढावा घेतात. यंदा ते सायंकाळी विमानाने शहरात येत आहेत. बैठकीनंतर ते परत विमानाने जाणार की नाही, हे स्पष्ट झाले नव्हते.