आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषयाला मान्यता नसताना विज्ञान, वाणिज्य शाखेला दिला प्रवेश, उआठ महाविद्यालयांना बोर्डाने ठोठावला दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विषयाला शिक्षण संचालकांची मान्यता नसताना काही शाळा, महाविद्यालयांनी दहावी आणि बारावीत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. अशा आठ महाविद्यालयांना बोर्डाने प्रति विद्यार्थी शंभर रुपयांप्रमाणे दंड केला आहे. तसेच नियमबाह्य प्रवेशाबद्दल कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून कारवाई करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत.
शिक्षण क्षेत्रात स्पर्धा वाढली असून महाविद्यालयांना मान्यता राहावी याकरिता विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या विषयाला अकरावी व बारावीला प्रवेश दिला जातो; परंतु या विषयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देताना शिक्षण संचालक कार्यालयाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील आठ महाविद्यालयांनी तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना विषयाला बोर्डाची परवानगी नसताना प्रवेश देण्यात आला आहे.
बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी केली जात आहे. या अर्जांची तपासणी सुरू असताना हा प्रकार समोर आला. त्यानंतर बोर्डाचे अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी त्या आठ महाविद्यालयांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे हजार रुपये दंड केला. मात्र, यावर चूक कबूल करत महाविद्यालयांनी एक हजारऐवजी शंभर रुपये दंड भरण्याचे पत्रक बोर्डाला दिले. विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देणार असल्याचे डेरे यांनी सांिगतले.

महाविद्यालयांची नावे
दंड करण्यात आलेल्या महाविद्यालयांमध्ये सर्वाधिक नावे ही मराठवाडा शिक्षण मंडळ संचालित महाविद्यालयांची आहेत. न्यू हायस्कूल (दावरवाडी, पैठण), न्यू हायस्कूल (महालगाव, वैजापूर), न्यू हायस्कूल (अंभई, सिल्लोड), न्यू हायस्कूल (खुलताबाद), बजाजनगर येथील लालबहादूर शास्त्री या महाविद्यालय- शाळांचा यात समावेश अाहे. बोर्डात अर्जांची छाननी सुरू असून आणखी शाळा, महाविद्यालयांत अशा पद्धतीने प्रवेश झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.