आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या गटनेतेपदी उपमहापौर प्रमोद राठोड यांची यांची निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारतीय जनता पक्षाचे पालिकेतील गटनेते म्हणून माजी उपमहापौर प्रमोद राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौर झाल्यानंतर ही जबाबदारी भगवान घडामोडे यांच्याकडे होती. शनिवारी सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागी नवी नावे गटनेते आपापल्या पक्षाकडून देणार आहेत. तेव्हा भाजपकडून गटनेता म्हणून कोण नावे देणार किंवा घडामोडे स्वत:च नाव देणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. या प्रश्नाचे उत्तर भाजपनेच शुक्रवारी सायंकाळी दिले.
 
घडामोडे यांना या पदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे सदस्य करत होते. घडामोडे यांची जागा घेण्यासाठी राठोड, माजी सभापती दिलीप थोरात तसेच माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यात स्पर्धा होती. परंतु पक्षाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी राठोड यांच्या नावाने पत्र देण्यात आले. शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी राठोड यांच्याकडे गटनेतेपद द्यावे, असे पत्र महापौर घडामोडे यांना दिले आहे. त्यानुसार राठोड यांच्या नावाचे घडामोडे पत्र काढतील. 

घडामोडे हे गटनेते असल्याची नोंद विभागीय आयुक्तांकडे २०१५ मध्ये करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर राठोड यांच्या नावाची नोंद करण्याची प्रक्रिया नंतर पार पाडली जाईल, असे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपकडून एक सदस्य स्थायी समितीवर पाठवला जाणार असून त्या नावाची शिफारस आता राठोड करतील. राठोड हे स्थायी समितीवर सदस्य म्हणून जाणार असल्याची चर्चा होती. परंतु आता ते या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. राठोड यांना पक्षाचे गटनेते केल्याचे पत्र सायंकाळी उशिरापर्यंत घडामोडे यांनी दिले नव्हते. 
बातम्या आणखी आहेत...