आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपमहापौरांची महागडी सायकल चोरीला !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सायकल चोरांनी थेट उपमहापौरांना झटका दिला. मनपात महिन्यातून एकदा येण्यासाठी एरवीही सायकलिंग करण्यासाठी त्यांनी घेतलेली विदेशी बनावटीची सायकल चाेरट्यांनी सोमवारी लंपास केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर गतवर्षीपासून त्यांनीही महिन्यातून एकदा मनपात सायकलवर जाण्याची मोहीम सुरू केली. त्यासाठी गेल्या वर्षी जानेवारीत त्यांनी फायरफाॅक्स या कंपनीची विदेशी बनावटीची सायकल विकत घेतली होती. आॅल टेरेन बाइक प्रकारात मोडणारी २१ गिअरच्या या सायकलची किंमत १७ हजार रुपये आहे. आज नेमकी हीच सायकल चोरीला गेली. सहाव्या वर्गात शिकणारा त्यांचा मुलगा वीरेन आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही सायकल घेऊन किटली गार्डनला गेला. गार्डनबाहेर त्याने कुलूप लावून ठेवलेली ही सायकल चोरट्यांनी लंपास केली. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
बातम्या आणखी आहेत...