आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देसरडा म्हणतात, मला अतिरिक्त आयुक्त करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - ‘मनपात सध्या मागेल त्याला मागेल ते पद, अशी लॉटरी सुरू असल्याने मला अतिरिक्त आयुक्त पदावर नेमा’, अशी मागणी करणारे पत्र माजी उपमहापौर व भाजपचे नगरसेवक प्रशांत देसरडा यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहे.


मनपामध्ये प्रभारी आयुक्तांनी नियुक्त्यांचा धडाका लावला असून काल पी. के. खोब्रागडे यांची नगर सचिव म्हणून नियुक्ती केली, तर उपअभियंता अफसर सिद्दिकी यांना कार्यकारी अभियंतापदाचा कार्यभार देण्यात आला. याबाबत प्रशांत देसरडा यांनी टीका केली असून मनपात सध्या मटक्याचे आकडे द्यावेत, तशी पदे दिली जात आहेत. मागेल त्याला मागेल ते पद वाटण्याचा हा प्रकार सुरू आहे. आपणाला 15-20 वर्षांचा नागरी सेवेचा अनुभव असल्याने अतिरिक्त आयुक्तपदावर माझी नियुक्ती करण्यात यावी. पदासाठी आपली मंजुरी मिळाल्यानंतर शासनाची मंजुरी आणण्याची जबाबदारी माझी राहील, असा टोलाही देसरडा यांनी लगावला आहे.