आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार सावंगी येथील बनावट विदेशी दारूचा अड्डा उद्ध्वस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जळगाव जिल्ह्यातून स्पिरिट आणून बनावट दारू तयार करणारी टोळी पकडून अड्डा उद््ध्वस्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिसांनी खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे केली. चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा बनावट दारूसाठा आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. सतीश जैस्वाल (५५), उषा जैस्वाल, (४७) नीलेश जैस्वाल (२०) आणि आशिष जैस्वाल (२५) यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई शिवाजी वानखेडे, आर. एस. कोरे, बी. एस. गिरी, बी. आर. नवले, डी. एच. कासलीवाल, एम. डी. जाधव, डी. डी. जाधव, ए. ए. गायकवाड, ए. जी. शिंदे, वी. डी. तांगडे, आर. एम. भारती, शेख निसार शेख सरदार, अ. ल. कोतकर, अश्विनी बोंदर, एस. एस. पाटील, यू. एन. उबाळे यांनी केली.

कारखान्यात बनणाऱ्या दारूमध्ये उत्तम दर्जाचे स्पिरिट वापरले जाते. या स्पिरिटवर योग्य प्रक्रिया करून सर्व प्रमाण शास्त्रशुद्ध पद्धतीने ठरवले जाते. यासाठी स्वतंत्र ब्लेंडर आणि टेस्टरची व्यवस्था असते. शिवाय कारखान्यातून येणाऱ्या दारूची विशेष अशी पॅकेजिंग सिस्टिम असते. मात्र, बनावट दारू तयार करणाऱ्या लोकांना ही पॅकेजिंग सिस्टिमचा अनुभव नसल्याने त्याची नक्कल होते. प्रामुख्याने बनावट दारू आणि कारखान्यातून येणाऱ्या दारूच्या बाटलीचे झाकण बॅच क्रमांक, लेबल यात फरक असतो.
बातम्या आणखी आहेत...