आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१५० कोटींच्या रस्त्यांचे डीपीआर करण्याची प्रक्रिया सुरू होणार, गुरुवारच्या स्थायी समितीसमोर प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातीलरस्त्यांच्या कामांसाठी १५० कोटी रुपये दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ही रक्कम केव्हा मिळणार हे अजून स्पष्ट झाले नसले तरी रक्कम आल्यानंतर तातडीने कामे हाती घेता यावी यासाठी विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे पालिकेने ठरवले आहे. यासाठी पीएमसी नियुक्त केली जाणार असून तिच्या मंजुरीचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी बैठकीसमोर पुन्हा एकदा ठेवला जाणार आहे.

पीएमसी नियुक्तीचा प्रस्ताव ११ नोव्हेंबरच्या बैठकीसमोर ठेवण्यात आला होता. परंतु सदस्यांच्या मागणीवरून तो स्थगित ठेवण्यात आला होता. जगप्रयाग इन्फ्रा प्रा. लि. या ठेकेदाराला प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम दिले जाणार आहे. दीडशे कोटी रुपयांच्या कामाचे अहवाल तयार करण्यासाठी ठेकेदाराला एकूण रकमेच्या १.२० टक्के रक्कम दिली जाणार आहे. शहरातील विविध रस्त्यांची सुधारणा करणे किंवा नव्याने करण्याचा अहवाल या समितीने द्यायचा आहे.

पीएमसीसाठी जुलै महिन्यात तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. जगप्रयागची कमी रकमेची निविदा आल्याने त्यांना अहवाल तयार करण्याचे काम सोपवण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

डांबरीकरण, काँक्रिटीकरणाचे कोटींचे प्रस्ताव
गुरुवारच्यास्थायी समितीसमोर शहराच्या वेगवेगळ्या भागातील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरणाचे मिळून सुमारे कोटींचे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. यातील बहुतांश कामांच्या निविदा मे जून महिन्यात काढण्यात आल्या होत्या. अन्य प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे प्रस्ताव स्थायी समितीसमोर आले आहेत. स्थायी समितीतील यापूर्वीच्या कामकाजावर नजर टाकली असता असे प्रस्ताव लगेच मंजूर होतात. त्यामुळे गुरुवारी हे सर्व प्रस्ताव मंजूर होणारच, असा सदस्यांना विश्वास आहे.
बातम्या आणखी आहेत...