औरंगाबाद - मुंबई-सिकंदराबाद-मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये २५ जुलै २०१६ पासून मुंबई येथून एक, तर २६ जुलै २०१६ पासून सिकंदराबाद येथून एक प्रथम श्रेणी वातानुकूलित डबा नियमितपणे लावण्यात येणार आहे. त्यामुळे आता देवगिरी एक्स्प्रेसमध्ये एक द्वितीय एसी एक डबा, दोन तृतीय श्रेणी एसी डबे, एक प्रथम श्रेणी एसी डबा, १२ द्वितीय श्रेणी शयन डबा, तीन जनरल, तर दोन एस.एल. आर असे एकूण २१ डबे राहतील.