आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साता-यासाठी महापालिकेची बरखास्तीच्या दिशेने वाटचाल, मुख्यमंत्र्यांची तत्त्वत: मान्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सातारा-देवळाई नगर परिषदेचा भाग औरंगाबाद महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव तत्त्वत: मंजूर झाल्याचे वृत्त असून या पुनर्रचनेसाठी महापालिका मार्च महिन्याच्या तिस-या आठवड्यात बरखास्त करण्याचीही तयारी सुरू झाली आहे. या प्रक्रियांमुळे महापालिकेची वॉर्ड रचनाही बदलणार असून आरक्षणही नव्याने काढले जाईल. त्यामुळे एप्रिल महिन्यात होणे अपेक्षित असलेली निवडणूक किमान सहा महिने पुढे ढकलली जाण्याचीही शक्यता आहे.
मंगळवारी मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सातारा- देवळाई नगर परिषद औरंगाबाद महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय झाल्याची बातमी औरंगाबाद शहरात चर्चेचा विषय झाली होती. मात्र, मंत्रिमंडळासमोर असा प्रस्ताव आलाच नाही, ही बाब सायंकाळी स्पष्ट झाली. दरम्यान, सायंकाळी नगरविकास मंत्रालयाकडून या एकत्रीकरणाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे मत मागवण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी अनुकूल मत कळवल्याने मुख्यमंत्री कार्यालयातील हालचालींना प्रचंड वेग आला असून बुधवारी (११ फेब्रुवारी) या विलीनीकरणाबाबत प्रारूप अधिसूचना जारी केली जाण्याची शक्यता आहे. मुंबईतून आमदार संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली.
असे झाले िवचारमंथन : औरंगाबादेत मनपा आणि साताऱ्यात नगरपरिषदेच्या हालचाली सुरु झाल्या असताना सातारा विलीनाकरणाचा प्रस्ताव मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. एमआयएमचा वाढत चाललेला प्रभाव पाहता शहराची सत्ता राखायची असेल हिंदुबहुल साताऱ्याचा समावेश करणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री कदम यांनाही पटवून देण्यात आले. त्यातच, ७ फेब्रुवारीच्या वॉर्ड आरक्षणाने तर युतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मोर्चेबांधणीला धक्का बसला. ११३ मधील किमान चाळीस वॉर्डात दलित, मुस्लिम निवडून आल्यास उर्वरित जागांतून बहुमत मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल, असे त्यांना वाटू लागले.

बरखास्तीसाठी 18 मार्चचा मुहूर्त
कायद्यातील तरतुदींनुसार निर्धारित वेळेत (एप्रिल २०१५) आयोगाला महापािलकेसाठी निवडणूक घ्यावीच लागेल. जर महापािलका मुदतीपूर्वी बरखास्त केली तर त्यानंतर निवडणूक घ्यायला सहा महिन्यांची मुदत िमळू शकते. त्यामुळे महानगरपािलकेची रचनाच बदलल्याचे कारण देत १८ मार्च रोजी औरंगाबाद महापािलका बरखास्त केली जाऊ शकते, अशी माहितीही समोर आली आहे. त्याआधी १८ मार्चपूर्वी चार आठवड्यांची मुदत देऊन प्रारूप आराखड्यावर हरकती आणि सूचना मागवल्या जातील. त्यानंतर अंतिम अधिसूचना जारी होताच बरखास्त केली जाईल.
मुंबईत घडामोडी
आज सकाळी युतीचे शिष्टमंडळ मुंबईत मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांना भेटले. आरक्षणाची सोडत पुन्हा घ्या आणि सातारा तातडीने मनपाच्या हद्दीत घ्या, असा आग्रह भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, भाजपचे आमदार अतुल सावे, भगवान घडामोडे, संजय केणेकर, विकास जैन यांनी धरला. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शिरसाट यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळेत अभिप्राय यावा यासाठी विशेष प्रयत्न केले, अशी माहितीही समोर आली आहे.
मनपात घडामोडी
शनिवारच्या सोडतीत शहरातील अनेक दिग्गजांना फटका बसला. पण सातारा मनपात येणार व नंतर नवीन आरक्षण सोडत निघणार या चर्चेनेच त्यांना हायसे वाटले. काही जणांनी आज महापालिका गाठत मुंबईहून काही आदेश आले का, अशी विचारणा केली.
खासदारांचे सत्कार
आमदार शिरसाट व भाजपची नेतेमंडळी साता-यासाठी मुंबईत ठाण मांडून आहेत. दुसरीकडे सातारा विलीनीकरण झाले अशी बातमी आज शहरात पसरली. साता-यात नागरिकांनी आनंदोत्सव केला. काही कार्यकर्त्यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांचा सत्कारही केला.