आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसा विकासाचा: बोरगाव अर्जचा 100 टक्के दुर्गंधीमुक्तीचा निर्धार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगाव अर्ज- फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील ग्रामस्थांनी नववर्षात स्वच्छतेचा वसा घेतला अाहे. त्याचाच भाग म्हणून यशवंत विद्यालयाच्या वतीने फेरी काढून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. यात ७०० विद्यार्थी फेरीत सहभागी झाले होते. बोरगाव अर्ज ९० टक्के हागणदारीमुक्त झाले असून २६ जानेवारीपर्यंत १०० टक्के हागणदारी मुक्त करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

बोरगाव अर्ज साधारणत: ४००० लोकसंख्येचे गाव असून गावात गणपतीचे मोठे मंदिर आहे. या मंदिराला शासनाने तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला आहे. तसेच थोर हुतात्मा सांडू वाघ यांचेदेखील स्मारक आहे. पंचायत समितीचे उपसभापती किशोर बलांडे राष्ट्रवादीचे उपजिल्हाप्रमुख मयूर वानखेडे यांच्या मध्यस्थीने ग्रामस्थांच्या सहकार्याने १२ सप्टेंबर २०१५ रोजी ग्रामपंचायत बिनविरोध काढली. रमेश बलांडे यांची सरपंचपदी, तर राजेंद्र ठोबरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आपापसातील मतभेद विसरून सर्व ग्रामस्थ गावाच्या विकासासाठी झटत आहेत. गावात नुकत्याच घेण्यात आलेल्या एका विशेष ग्रामसभेत गाव हागणदारीमुक्त गटार मुक्त आणि वृक्षारोपणाचा ठराव घेण्यात आला.

पहिला उपक्रम हागणदारी मुक्तीचा राबवण्यात आला आहे. गावातील ग्रामस्थ काही तरुण गावात हागणदारी मुक्तीचे महत्त्व समजावून जनजागृती करत आहेत. शासनाच्या वतीने देण्यात येत असलेले शौचालयाला १२ हजारांचे अनुदान मिळत असून याचा फायदा घेण्याचे अावाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

२८० शौचालयांचे बांधकाम पूर्ण
स्वच्छताभारत मिशनमध्ये गावाचा समावेश असून गावात ४३६ कुटुंबे आहेत. २८० शौचालये बांधण्याचे येथे उद्दिष्ट आहे. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. शौचालयासाठी प्रति लाभार्थींना १२ हजार रुपयांप्रमाणे १७ लाख ७६ हजार रुपये अनुदान वाटप करण्यात आलेले आहे.

प्रत्येक घरासमोर लावलेल्या वृक्षाला देणार पूर्वजाचे नाव
फुलंब्रीपंचायत समितीकडे लाख २० हजार रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, तर काहींचे प्रस्ताव पाठवणे बाकी आहे. गावांर्तगत रस्ते रुंदीकरण करण्यात आले असून गाव गटारमुक्त करण्यासाठी ५०० शोषखड्डे बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. लवकरच गावाच्या एक किमी रस्त्यावर विविध जातींची वृक्षरोपे लावण्यात येणार आहेत. प्रत्येक घरांसमोर एक वृक्षरोप लावण्यात येणार असून त्याला कुटुंबातील पूर्वजाचे नाव देण्यात येणार आहे. सरपंच रमेश बलांडे, उपसरपंच राजेंद्र ठोबरे, ग्रामसेवक बी. ए. गायकवाड, सदस्य, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.