आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadanvis News In Marathi, BJP, Divya Marathi

खोटी आश्वासने देणा-या सरकारपासून सावध राहा, देवेंद्र फडणवीस यांची आघाडी सरकारवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते. त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर सर्व शेतक-यांना शून्य पैसे वीज बिल पाठवले. शेतक-यांना वाटले सरकारने बिल माफ केले. मतदारांनी आघाडीच्या पदरात माप टाकल्याने हे पुन्हा सत्तेत आले. त्यानंतर यांनी पुन्हा या वीज बिलाची व्याजासह वसुली केली. तेच शिंदे आता कॉँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या वेळीही मोठी फसवणूक व धूळ फेक होण्याची शक्यता आहे. नेत्यांचा आदर्श घेऊन मंत्रीही अशाच प्रकारची खोटी आश्वासने देत असून या मतदारसंघातही हे सुरू असल्याने शेतक-यांनी सावध राहिले पाहिजे, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सिल्लोड येथे दिला.

भारतीय जनता पक्ष तालुका सिल्लोड-सोयगावच्या वतीने मंगळवारी येथील उपविभागीय कार्यालयावर दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांचा मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर झालेल्या सभेत फडणवीस यांनी सरकारवर टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर शेतक-यांना शून्य पैसे वीज बिल पाठवायचे व सत्तेत आल्यानंतर व्याजासह ते वसूल करून शेतक-यांची फसवणूक करणारे राज्यातील सरकार असल्याची टीका त्यांनी केली.