आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेंद्र्यात हयात, देलारू येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेंद्राडी एमआयसीमध्ये स्थानिक उद्योगांना खास जागा दिली जाणार असून लघुउद्योजकांना पहिल्याच टप्प्यात शंभर एकर जागा राखीव ठेवली आहे. शेंद्रा भागातील २० टक्के जागा त्यांना देऊ. त्यापैकी १० टक्के जागेवर गाळे बांधून दिले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच
ऑरिक सिटीमध्ये हयात हॉटेल, नोटा तयार करणारी इंग्लंडची देलारू कंपनी, जर्मनीची ऑटो फिल्म कंपनी येत आहे. किया मोटर्सही येणार असून उद्योगमंत्री देसाई यांनी अंतिम बाेलणी केल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी शेंद्रा डीएमआयसीमध्ये उभारण्यात येणाऱ्या ऑरिक हॉलचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वरील माहिती त्यांनी दिली. बुधवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने थेट मुंबईहून शेंद्रा येथे आले. विस्तीर्ण शिवारात उभारलेल्या जागेवरील कोनशिलेचे अनावरण अाणि भूमिपूजन त्यांनी केले. त्यानंतर ऑरिक सिटीच्या छोटेखानी कार्यालयासमोर उभारलेल्या मंडपातच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ऑरिक सिटी आणि पाचशे एक हजाराच्या नोटांवरील बंदीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीवरही भाष्य केले.

मुख्यमंत्री म्हणाले, देशातील सर्वात मोठ्या पहिल्या स्मार्ट इंडस्ट्रियल टाऊनशिपची आज औरंगाबाद शहरातून सुरुवात होत आहे. शेंद्रा डीएमआयसीच्या पायभूत सुविधांचे काम २०१८ पर्यंत पूर्ण होईल, तर बिडकीनचे काम तीन टप्प्यांत म्हणजे २०१७ ला सुरू होऊन २०२० सन २०२१ आणि २०२२ पर्यंत पूर्ण हाेईल.

वीज,पाणीटंचाई नसेल : मुख्यमंत्र्यंंानीसांगितले की, ही संपूर्ण वसाहत आयसीटी कंट्रोल सिस्टिमने चालेल. येथे उच्च दर्जाची वीज, पाणीपुरवठा यंत्रणा राहील. त्यात खंड पडणार नाही. विजेच्या प्रत्येक युनिटचा आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब राहील. डीएमआयसीसाठी जायकवाडीतील ५० टक्केच पाणी वापरले जाईल, तर उर्वरित पाणी रिसायकल पद्धतीने वापरण्यात येईल. संपूर्ण शहराला तीन दिवस पुरेल इतका पाण्याचा साठा डीएमआयसीत असेल. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका डीएमआयसीला कधीच बसणार नाही.

हजारकोटींच्या गुंतवणुकीस मान्यता : मुख्यमंत्रीफडणवीस यांनी स्पष्ट केले की, शेंद्रा डीएमआयसीत सुरुवातील हजार कोटी रुपयाच्या गुतंवणुकीची मान्यता केंद्राने दिली होती. त्यात वाढ करून हजार कोटींच्या गुंतवणुकीस मान्यता दिली आहे. त्यापैकी ६०० कोटींचा निधी राज्य सरकारकडे आला आहे.

मुख्यमंत्र्यांना गराडा
फडणवीस सर्वच कार्यक्रमांना हेलिकॉप्टरने फिरले. सकाळी १० वाजता त्यांचे शेंद्रा हेलिपॅडवर आगमन झाले तेव्हा भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांना गराडा घातला. या वेळी विधानसेभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार चंद्रकांत खैरे, अतुल सावे, प्रशांत बंब, संजय शिरसाट, सतीश चव्हाण, किशनचंद तनवाणी यांच्यासह भाजप -शिवसेनेचे अनेक पदाधिकारी होते.
बातम्या आणखी आहेत...