आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चव्हाणांना मुख्यमंत्र्यांचा टोला, मध्यावधीची भाषा कराल तर वांद्र्यासारखे हाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मध्यावधीची भाषा कराल तर वांद्र्यात जे झाले ते सर्वत्र होईल, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना लगावला.
कामाला लागा, लवकरच राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण शुक्रवारी प्रचार सभेत म्हणाले होते. त्याला प्रत्युत्तर देताना जयभवानीनगरात झालेल्या प्रचारसभेत फडणवीस म्हणाले, वांद्र्यात काय झाले, हे काँग्रेसने पुन्हा एकदा बघावे, तसेच हाल अन्यत्र केले जातील. या महानगरपालिकेत काय होते, हेही पहावे.

या पालिकेत काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या दुहेरी आकडाही गाठू शकणार नाही, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आमदारांनी गब्बर पैसा कमावला असून लवकरच ते त्यांच्या जागी दिसतील, असेही त्यांनी नमूद केले.