आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devgiri Fort News In Marathi, Aurangabad, Divya Marathi, Marathwada

वैभवशाली इतिहासाची साक्षी देणारा देवगिरी किल्ला झाला जीर्ण शीर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐतिहासिक देवगिरी किल्ला महाराष्ट्राची शान आहे. जगभरातील पर्यटक येथे येतात. वर्षानुवर्षे ऊन, पाऊस, वारा सहन करत हा किल्ला आजही पर्यटकांना भुरळ घालतो. मात्र, देखभाल-दुरुस्तीअभावी किल्ल्याची मोठी पडझड झाली आहे. नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे किल्ल्याचा पाथवे उद्ध्वस्त झाला असून समोरच्या तटबंदीपासून मुख्य द्वार पाहत किल्ल्यात शिरतो तेव्हा किल्ल्याची झालेली हानी पाहून पर्यटकांचा हिरमोड होतो. पाय-या चढत जसजसे पुढे जातो तशी पडझड पाहायला मिळते.


गणपती मंदिराची दुरवस्था
किल्ला चढत वर गेल्यावर पेशव्यांनी बांधलेले गणपती मंदिर पाहायला मिळते. मात्र, या मंदिराचीही दुरवस्था झाली आहे. कळसाजवळील भाग जीर्ण झाला असून मंदिराच्या पडझडीस सुरुवात झाली आहे. भुयारी मार्ग सुस्थितीत असला तरी वरील भागात असलेल्या गॅलरीलाही मोठे भगदाड पडले असून कठडेही कमकुवत झाले आहेत. ही गॅलरी पर्यटकांसाठी धोकादायक ठरू शकते. कारण येथूनच खंदकाचा खोल रस्ता आहे.


पुढे वाचा काय झाले गारपिटीमुळे.....