आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवगिरीची निवडणूक : बागडे, काळेंची प्रतिष्ठा पणाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड- औरंगाबाद व फुलंब्री तालुक्याचे वैभव असलेल्या देवगिरी सहकारी साखर कारखान्याचे २१ संचालक निवडण्यासाठी गुरुवारी (दि. १६) मतदान होत आहे. या निवडणुकीत माजी आमदार डाॅ. कल्याण काळे, काँग्रेस सेवादल अध्यक्ष विलास औताडे व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
फुलंब्री तालुक्याची युती शासनाच्या काळात १९९९ मध्ये निर्मिती झाली. तत्पूर्वी औरंगाबाद व फुलंब्री एकत्रच होते. या भागात पुरेसे उसाचे क्षेत्र असूनही सहकारी साखर कारखाना नव्हता म्हणून १९७८-७९ च्या जनता राजवटीत तत्कालीन राज्यमंत्री डॉ. नामदेवराव गाडेकर यांची कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून निवड करण्यात आली. बऱ्याच प्रयत्नांनी १९८९-९० मध्ये या कारखान्यास केंद्र सरकारने मंजूरी दिली. दोन वर्षात कारखान्याची उभारणी होऊन १९९२ मध्ये पहिले गळीत झाले. सुरुवातीचे काही दिवस वर्षे कारखाना चांगला चालला, परंतु त्यानंतर अनेक राजकीय स्थित्यंतरात कारखान्याचा विकास रखडला. गटातटाच्या राजकारणामुळे या कारखान्यात केवळ १३ गळीत हंगाम घेण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून कारखाना बंद पडून कर्जबाजारी झाला आहे. कारखान्याची काही जमीन विकून कारखाना कर्जाच्या बाहेर काढून त्याची होणारी हर्रासी टाळता येते. परंतु एकहाती सत्ता असल्यामुळे सर्व प्रक्रिया जिथल्या तिथे अडकून पडल्या आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच गुरुवारी या कारखान्याची निवडणूक होत आहे.

गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून फुलंब्री व औरंगाबाद तालुक्यातील ४५ मतदान केंद्रांवर ऊस उत्पादक गटाचे मतदान होणार अाहे, तर सोसायटी मतदारसंघाचे मतदान औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणार आहे.
निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे
या कारखान्यात ऊस उत्पादक गटामधून २०, तर सोसायटी मतदारसंघातून एक असे २१ संचालक निवडून द्यायचे आहेत. निवडणुकीसाठी १७७ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली होती. त्यापैकी ९९ जणांनी उमेदवारी मागे घेतली. आता प्रत्यक्षात ७८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रथमच दोन गट पडले आहेत. काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास औताडे व माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी स्वतंत्र दोन पॅनल उभे केले आहेत. िवधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व विद्यमान चेअरमन डाॅ.नामदेवराव गाडेकर यांनी भाजपचे पॅनल उभे केले आहे. डॉ. कल्याण काळे यांच्या पॅनलला राष्ट्रवादीच्या एका गटाने तर राष्ट्रवादीच्याच दुसऱ्या गटाने भाजपच्या पॅनलला पाठिंबा दिला आहे. ही निवडणूक अत्यंत रंगतदार हाेण्याची चिन्हे आहेत.
मतदारांना फारसा रस नाही
फुलंब्री । देवगिरी कारखान्यासाठी १७,६२० मतदार अाहेत. यातील जवळपास चार ते साडेचार हजार मतदार मृत अाहेत. मृत मतदारांचे वारसाने एकही भागभांडवल पूर्ण झाले नाही. कारण वारसाने शेअर्स पूर्ण करण्यासाठी दहा हजार रुपये हे राेखीने भरावे लागतात.तेही मतदारांनी केले असते. मात्र, अातापर्यंत कारखाना सुरळीत न चालल्याने यात मतदारांना रस राहिलेला नाही.कारखाना कार्यक्षेत्र हे अाैरंगाबाद तालुका पूर्ण व फुलंब्री तालुक्यातील पाल, िकनगावपर्यंत जळपास ३६ गावांचा समावेश अाहे. तरीही अाैरंगाबाद तालुक्यापेक्षा फुलंब्री तालुक्यात हे मतदान दुप्पट अाहे.
बातम्या आणखी आहेत...