आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघाची ‘नानां’ना ना कळताच सेना रिंगणात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ३० हजार मतदार असलेल्या देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या निवडणुकीत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लांबच राहण्यास सांगितले. त्यामुळे शिवसेनेने या १३५० कोटींची उलाढाल असलेल्या या बँकेच्या निवडणूक रिंगणात अखेरच्या क्षणी उडी घेतली आहे. लोकविकास बँकेचा अनुभव गाठीशी असल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
१७ संचालकांसाठी १८ सप्टेंबर रोजी मतदान होऊन १९ सप्टेंबरला निकाल जाहीर होणार आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे २२ ऑगस्टपर्यंत ४४ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. आैरंगाबाद, जालना, जळगाव, पुणे, लासूर स्टेशन आदी ठिकाणी बँकेच्या शाखा आहेत. निवडणुकीत संघप्रणीत पॅनलमध्ये किशोर शितोळे, अरविंद धामणे, केशव पारटकर, शिवाजी शेरकर, अशोक पाटील, जयंत अभ्यंकर, राजेश सावळकर, जयश्री चामरगोरे, उद्योगपती रामचंद्र बागले, सुनील रायठट्टा, पुरूषोत्तम कुलकर्णी, सजनराव मते, मंजुषा कुलकर्णी, जयश्री किवळेकर, संजय गायकवाड, संभाजी मुळे, पंडीत घुगे आदींचा समावेश आहे. शिवसेनेतर्फे नगरसेवक राजू वैद्य, रावसाहेब आमले, माजी नगरसेवक किशोर नागरे, गिरजाराम हाळनोर, सूर्यकांत जायभाये, राजेंद्र दानवे, सुनीता देव, अनिल साळवे, अनिल जैस्वाल, बॅँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक महेशचंद्र कवठेकर, आसाराम तळेकर आदींचाही समावेश आहे.
नाराजीहेरली : बॅंकेचेपदाधिकारी मंजु कुलकर्णी, राम भोगले, मिलिंद कंक यांच्याविरूद्ध इतर सभासदांमध्ये असलेली नाराजी मागील दोन वर्षात शिवसेना जिल्हाप्रमुख दानवे यांनी हेरली. बागडे यांच्याशिवाय या बँकेवर जे संचालक आहेत, ते सेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाव देत नाहीत, सत्ता आल्यानंतर त्यांची दादागिरी वाढली असल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘जिंकू अथवा हारू पण भाजपसंगे लढू’ अशी भूमिका सेनेने घेतली आहे. बागडे निर्णय प्रक्रियेत नसल्याने यास अधिकच हवा मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बँकेवर रा. स्व. संघाची मजबूत पकड आहे. त्यामुळे शिवसेनेने कितीही जोर लावला तरी शेवटी त्यांच्या हातून ही बँक जाणार नाही, असे बोलले जाते.

^निवडणुकीत कोणीकोणते पॅनल दिले, याच्याशी मला काहीही देणे-घेणे नाही. मी अध्यक्ष असले तरी तेथील राजकारणाशी माझा संबंध नाही. लोकशाहीत कोणीही निवडणूक लढवू शकतो. डॉ.मंजू कुलकर्णी, विद्यमान अध्यक्ष.

पैसे सांभाळण्यासाठी
^ही सहकारी बँक आहे. पक्ष म्हणून ती ताब्यात घेता यावी यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आहोत. यामागे कोणतेही राजकीय कारण नाही. सामान्यांच्या पैशांचा व्यवस्थित सांभाळ करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. राजू वैद्य, शहरप्रमुख, शिवसेना.

देवगिरी बँक निवडणूक
मतदार : ३० हजार
उलाढाल :१३५० कोटी
संचालक : १७ जागा
बातम्या आणखी आहेत...