आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आज, दिवसभर भरगच्च कार्यक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बुद्धलेणीवर६० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज सकाळी ते पर्यंत तैवान, जपान आणि बुद्धगया येथील बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत सोहळा होईल. यासाठी सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करूनच यावे, असे आवाहन सोहळ्याचे मुख्य आयोजक भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी केले आहे. सोहळा संपल्यानंतर (१२ ऑक्टोबर) सकाळी ते १२ पर्यंत युवकांच्या सहभागासह श्रमदानातून लेणी परिसर स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे.
बुद्धलेणी परिसरात सकाळी धम्मध्वजारोहण होऊन ११ वाजता परित्राण पाठ पंचशील-त्रिशरण होईल. दुपारी १२ ते पर्यंत बौद्ध भिक्खूंची धम्मदेसना होईल. ते पर्यंत सर्व वयोगटातील गायकांसाठी बुद्ध-भीमगीत गायन स्पर्धा होईल. विजेत्यांना प्रथम ५०००, द्वितीय ३०००, तृतीय १००० आणि उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जातील. दुपारी आयोजित सोहळ्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी निधी पांडे, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित असतील. सोहळ्यासाठी भदंत नागसेन बोधी, भदंत चंद्रबोधी, भन्ते महानामा, भन्ते धम्मबोधी, भदंत सुदत्त बोधी, धम्मदीप मेत्ता परिश्रम घेत आहेत.

श्रमदानातून होणार लेणी परिसर स्वच्छ
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यानंतर लेणी परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. बौद्ध उपासकांनी केलेला कचरा श्रमदान करून बौद्ध उपासकांनीच स्वच्छ करण्याचा यंदा संकल्प करण्यात आला आहे. १२ ऑक्टोबरला सकाळी ते दुपारी १२ पर्यंत श्रमदानातून लेणी स्वच्छ करण्यात येणार आहे. या मोहिमेत युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बुद्धलेणी स्वच्छता अभियानाचे सुनील मगरे, राजू नरवडे, शेषराव सातपुते, पवन जाधव, अशोक मोरे, दीपक काळे, राजू बनकर, नितीन कांबळे आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...