आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेणीवर विदेशी भिक्खूंच्या उपस्थितीत सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - धम्मभूमी,बुद्धलेणी येथे ६० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा ११ ऑक्टोबर रोजी तैवान, जपान आणि बोधगया येथील बौद्ध भिक्खूंच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे सर्व उपासकांनी शुभ्र वस्त्र परिधान करूनच यावे, असे आवाहन प्रज्ञा प्रसार धम्मसंस्कार केंद्राचे अध्यक्ष तथा सोहळ्याचे मुख्य आयोजक भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांनी शुक्रवारी (७ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत केले.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मंगळवारी सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ६० युवकांनी श्रामणेर दीक्षा घेतली आहे. त्यांच्या शिबिराचा समारोप या सोहळ्यात होईल. भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो म्हणाले, ‘३५ वर्षांपासून बुद्धलेणीच्या पायथ्याशी सुमारे दोन लाख बौद्ध उपासक-उपासिकांच्या उपस्थितीत हा आनंद सोहळा साजरा केला जातो. यंदा शुभ्र वस्त्रांमध्ये २२ प्रतिज्ञांचे पठण होईल. तत्पूर्वी, सकाळी धम्मध्वजारोहण होईल. ११ वाजता परित्राण पाठ, पंचशील-त्रिशरण होणार आहे. दुपारी १२ ते पर्यंत तैवान, जपान आणि बोधगया येथील बौद्ध भिक्खूंची धम्मदेसना होईल. दुपारी ते सायंकाळी पर्यंत सर्व वयोगटांतील गायकांसाठी बुद्ध-भीमगीत गायन स्पर्धा होईल. विजेत्यांना प्रथम ५००० रु., द्वितीय-३००० रु., तृतीय-१००० रु.आणि उत्तेजनार्थ १००० रुपयांचे पारितोषिक दिले जाईल. दुपारी आयोजित सोहळ्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाधिकारी निधी पांडे, पोलिस आयुक्त अमितेशकुमार, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित राहणार असल्याचे विशुद्धानंद बोधी यांनी सांगितले. या वेळी भदंत नागसेन बोधी, भदंत चंद्रबोधी, भन्ते महानामा, भन्ते धम्मबोधी, माजी नगरसेवक गौतम खरात, विजय मगरे, बाबा तायडे, विजयकुमार हिवराळे आणि दादाराव सोनटक्के उपस्थित होते.

लेणीकडे येणाऱ्या तीन मार्गांची दुरुस्ती करा
लेणीकडे येण्यासाठी विद्यापीठ आणि मकबरा मार्गांसह एकूण तीन मार्ग आहेत. या तिन्ही मार्गांची दुरुस्ती मनपाने करावी. विद्युत विभागाने विजेची पुरेशी व्यवस्था करावी. शिवाय ‘घाटी’तर्फे वैद्यकीय शिबिर लेणीजवळ द्यावे. पोलिस आयुक्तांनी अनेक वर्षांपासून लेणीच्या पायथ्याला पोलिस चौकी देऊ केली आहे, मात्र पोलिस कर्मचारी येथे थांबत नसल्याची तक्रार विशुद्धानंद महाथेरो यांनी केली. लेणी परिसरात प्रेमीयुगुलांना लुटण्याचे प्रकार घडताहेत. त्यास पोलिस प्रशासनाने प्रतिबंध घालावा. संपूर्ण सोहळ्याच्या आयोजनासाठी विजय मगरे यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केल्याचे विशुद्धानंद महाथेरो यांनी या वेळी जाहीर केले.
बातम्या आणखी आहेत...