आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री निवासात गाय बांधणार, धनंजय मुंडे यांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड- शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, तर एक दुभती गाय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बांधू, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. 

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नान्नज येथे सोमवारी मुंडे यांची प्रचारसभा झाली. सभेस राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, दत्तात्रय वारे, प्रा. मधुकर राळेभात, संजय वराट, जवळा गटाचे उमेदवार बबन तुपेरे, गणाचे उमेदवार डॉ. गोरख भवाळ, हाळगाव गणाच्या उमेदवार शकुंतला निगुडे आदी उपस्थित होते. मुंडे यांनी नोटबंदीवर टीका करताना या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे ३० हजार कोटींचे नुकसान झाल्याने मी जनतेला शहाणे करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणप्रश्नी फसवणूक करणाऱ्या सरकारला जनता माफ करणार नाही, असेही त्यांनी सांगितले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...