आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhanjay Munde Speak At School Occasion Of School Gathering

शिकण्यासाठी स्नेहसंमेलन महत्त्वपूर्ण- धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शाळेतील स्नेहसंमेलन हे दिवाळी-दसरा सणासारखे असून याची सर्व जण आतुरतेने वाट पाहतात. या आनंदाचा क्षण विद्यार्थ्यांना नवीन शिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.

सिडको नाट्यगृहात मंगळवारी गोदावरी हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुंडे म्हणाले, एकेकाळी विद्यार्थी असतानाही मीही स्नेहसंमेलनाची आतुरतेने वाट पाहत होतो. स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते. जेणेकरून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत: व्यक्त होणे गरजेचे आहे. कमी वयात विरोधी पक्षाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. यात होमिओपॅथीचे प्रलंबित प्रश्न संघर्षातून पुढे नेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी अध्यक्षस्थानी आ. विक्रम काळे, एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, शुभांगी काळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष अभिजित देशमुख, हास्यसम्राट ह. सो. राठोड, प्रा. डॉ. पवन डोंगरे, प्रा. डॉ. कांचन देसरडा, प्रा. अरुणकुमार भस्मे आदींची उपस्थिती होती. ह. सो. राठोड म्हणाले, पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण वाढत चालले आहे. भारताची संस्कृती जपली पाहिजे. आजचे विद्यार्थी चुकीच्या दिशेने जात आहेत. त्यासाठी देश घडविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असून चारित्र्य चांगले ठेवले पाहिजे, असे मत व्यक्त केले. या वेळी कार्यक्रमात डॉ. पवन डोंगरे, डॉ. कांचन देसरडा आदींनी मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमप्रसंगी प्रकाश परदेशी, विद्यार्थी संसद अध्यक्ष वैष्णवी गायकवाड, रूपाली धमाले, ऋतुजा देशपांडे, प्रा. रंजना रांजणीकर, नितीन कवडे, मंगला कुलकर्णी, उपमुख्याध्यापक दिलीप सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

राजकारणात उडी घ्या
राजकारणहे वाईट नसून राजकारणातील अपप्रवृत्ती दूर करण्याची गरज आहे. त्यासाठी युवकांनी राजकारणात यावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले. शिवछत्रपती महाविद्यालयात मंगळवारी आमदार सतीश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुंडे बोलत होते. मुंडे म्हणाले, संघर्ष केल्याशिवाय यश प्राप्त होत नाही त्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे. त्यासाठी राजकारणात पडू नका तर राजकारणात उडी घ्या, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी आ. सतीश चव्हाण, विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. राजेश करपे आदी मान्यवर उपस्थिेेत होते. रक्तदान शिबिरात ५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या वेळी कार्यक्रमात विद्यार्थी संसद सचिव गणेश बिटूदे, योगेश आघाव, धनंजय मांगदरे, नागेश भरसाने, प्रा. लक्ष्मीकांत श्रीमंगल, आश्रुशा गवळी, रवी मदन आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे तर आभार प्राचार्य डॉ. पी. व्ही. आष्टेकर यांनी मानले.