आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"धन्वंतरी'च्या पदाधिकाऱ्यांना अटकच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - वीज बिल वसुलीच्या अपहार प्रकरणाच्या तपासाला पोलिसांनी गती दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी धन्वंतरी महिला सहकारी बँकेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

परंतु, स्टेट बँक ऑफ हैदराबाद व महावितरणकडे संस्थेने भरणा केलेल्या रकमांची माहिती मागवली आहे. वसूल केलेल्या वीज बिलाची रक्कम महावितरणच्या खात्यात जमा न केल्याने धन्वंतरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. या अपहारात नेमका कोणाचा हात आहे, याचा सखोल छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

महावितरणच्या स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या खात्याचा उतारा मागवण्यात आला आहे. तसेच महावितरणकडे असलेल्या नोंदी व संस्थेने भरणा केलेल्या नोंदींची मागणी संबंधितांकडे करण्यात आली आहे. या सर्व नोंदी प्राप्त झाल्यावर यातील गैरव्यवहार समोर येईल. हा व्यवहार पाहणारा कर्मचारी अद्याप बेपत्ता आहे. त्याचा जबाब महत्त्वपूर्ण राहणार आहे.
श्रीनिवास भिकाने, पोलिस उपनिरीक्षक
बातम्या आणखी आहेत...